पान:कार्यशैली.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जसं जोसेफ कॅम्पबेलनं एका ठिकाणी म्हटलं आहे की,"तुमच्या परम आनंदाचा शोध घ्या." जिथं तुमचं मन रमतं, जिथं तुम्हाला गती आहे आणि जिथं तुमच्यासमोर अतिउत्तुंग आणि अशक्य आव्हानं उभी आहेत तिथं मग पाहा तुम्ही कसे प्रवाहात सर्वस्व विसरून काम कराल ते.
 मात्र एक आहे, तुमच्यासमोर असलेलं आव्हान आणि तुमच्याकडे असलेली कौशल्यं यांचा योग्य मेळ हा हवाच.आव्हान आणि तुमच्याकडे असलेली कौशल्यं यांचा योग्य मेळ हा हवाच.आव्हानही मोठं आणि कौशल्यही भरपूर असं असेल तर प्रवाह' सापडेल.क्षुल्लक आव्हान असेल आणि सामान्य कौशल्य असेल तर उगाचच एक व्यर्थ अधीरता दिसेल.प्रचंड कौशल्य पण अगदी क्षुल्लक आव्हान असेल तर एक खोल कंटाळवाणेपण येईल.तेव्हा आव्हान आणि कौशल्य, यांचा एक अभूतपूर्व मिलाफ आपण सध्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 कामाचा एक सुंदर प्रवाह माणसाला सारं सारं विसरायला लावतो.उत्तुंग आव्हानं आणि अफाट कौशल्यांचा खजिना असा प्रवाह तुमच्यासाठी निर्माण करू शकेल,ज्यांनी तुम्ही विनासायास काम करत राहाल,उत्तुंग शिखरं काबीज करत.

१३१। कार्यशैली