७७. अमूल्य
एक सुंदर सूफी कथा आहे.फारच सुंदर.म्हटलं आहे : एक माणूस दिवे मिळण्याचं दुकान
शोधत हिंडत होता.त्याला काही दुकान सापडत नव्हतं.मग कंटाळून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाला त्यानं विचारलं. दिवे कुठल्या दुकानात मिळतील हो? दिवे.
तो माणूस सरळ नव्हता.त्यानं म्हटलं.ते मी सांगतो,पण मला सांगा,की तुम्हाला दिवे पाहिजेत तरी कशाला? यावर पहिला म्हणाला, "अहो, मला असं समजलं की रात्री अंधारातसुद्धा ज्याच्या सहाय्यानं वाचता येईल असं यंत्र म्हणजे म्हणे दिवे."
त्यावर दुसरा म्हणतो कसा "ते खरं आहे हो, पण त्या यंत्राचा आणि दिव्याचा उपयोग होण्यासाठी,म्हणजे अंधारात वाचता येण्यासाठी एका गोष्टीची विशेष आवश्यकता आहे आणि ती म्हणजे वाचता येण्याची. त्याचं काय"
पहिला बुचकाळ्यात पडला. वाचता येणं म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हतं. पण तरीही तो दिवे शोधायला बाहेर पडला. त्याला दिवे मिळालेही. पण त्यामुळं त्याला वाचता नाही आलं.
सर्व गोष्टी विकत नाही मिळत. काही गोष्टी कष्टानंच, श्रम करूनच मिळतात आणि त्याच गोष्टी अमूल्य असतात.