पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उर्दू माध्यमाची शाळा : १९५० चे दशक, महाराष्ट्र 

मुलांना शिक्षण देण्याचे मुसलमान पालकांनी बंद केले. चाळीस मुलांच्या पालकांनी मागणी केल्यास उर्दू शाळा देण्यात येईल, या धोरणानुसार उर्दू शाळांच्या मागण्या भराभर करण्यात आल्या. शाळांच्या भराभर फाळण्या झाल्या आणि सर्वच मुले उर्दू माध्यमातून शिक्षण घेऊ लागली.
  चाळीस मुलांच्या पालकांनी उर्दू शाळेची मागणी केल्यास त्यांना उर्दू शाळा द्यावी, हे धोरण कोणत्या तत्त्वास धरून आखण्यात आले? या चाळीस मुलांच्या पालकांच्या मागणीचा निकाल कोणत्या न्यायाने लावण्यात आला? महाराष्ट्रातल्या- विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या- मुसलमानांची मातृभाषा उर्दू आहे, असे सरकारला म्हणावयाचे आहे काय?

  आम्ही मुसलमान महाराष्ट्रात धार्मिक दृष्ट्या अल्पसंख्य असलो तरी भाषिक

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ७