शाळेतल्या 'बाईंना' ही सुसान अगदीं आवरेनाशी झाली. इतर मुली फार मर्यादेनें हळू बोलत, आणि झाकून पाकून हिंडत; पण सुसानला मर्यादा कशाशीं खावी हें मुळींच कळत नसे. मुलांच्यासारखी ती फडाफड बोले, आणि स्त्रीजातीचा बिभिस्तपणा टाकून देऊन चारचौघांसमोर बेलाशक हिंडूं लागली. मास्तरीण बाई तिला सारख्या रागे भरीत, बायबलांतले दाखले देत, आणि 'बायकांच्या जातीनें सौम्यपणाने आणि आदबीनेंच वागले पाहिजे' असें तिला दरडावून सांगत; पण ही पोरगी अगदीं बेदरकार निघाली! वर्गात ती मोठमोठ्यानें हंसत असे. बाईंना हें बिलकुल खपेना. त्या म्हणत, 'मुलींची जात; हंसायचें झालें तर थोडें मंजूळ, गालांतल्या गालांत आणि कोणाला ऐकूं न जाईल अशा बेतानेंच मुलींनीं हंसलें पाहिजे.' पण सुसानचे पहावें तों घसा मोकळा करून ती 'खोखो' हंसत असे. शाळेत मुलींना पत्रे आली, तर तीं प्रथम बाईंनीं पाहायची अशी चाल असे; किंवा त्यांनीं कोणाला पाठविलीं, तरी तीं बाईंच्या नजरेतून गेली पाहिजेत अशी सक्ति असे. सुसान म्हणे कीं, 'मी इतर कोणाला पत्र लिहिलें, तर तुम्हीं तें पहावें हें बरोबर आहे. पण मी माझ्या बाबांना लिहिलेले पत्र तुम्ही काय म्हणून पहावें? मी जर आमच्या घरांतील कांहीं खाजगी बाब लिहिली असली, तर ती तुम्ही काय म्हणुन पहावी?' अशावरून मास्तरणींशीं तिचीं भांडणें होत, आणि तिला कडक शासनहि होई. एकदां शाळेच्या वसतिगृहांची वार्षिक धोतीपोती सुरू झाली. सगळया मुली झाडावयास लागल्या; आणि त्या आपले काम बेताबेतानें करीत होत्या. पण या पोरीच्या अंगांत नेहमीं पुंडाईचें वारें भरलेलें असें. शाळेच्या आढ्याला जळमटें लागलीं आहेत असे दिसलें, तीं कशीं काढावीं असा प्रश्न पडला, असें दिसतांच सुसान ही टाणकन् उडी मारून बाईच्या टेबलावर उभी राहिली. आणि केरसुणीनें वरचें झाडूं लागली. जळमटें निघालीं कीं नाहीं कोणास ठाऊक, पण उडीच्या हबक्यानें बाईचें टेबल मात्र मोडलें. त्याबरोबर काकूंचा संताप अगदीं अनावर झाला. त्यांनी शाळेंतल्या साऱ्या मुली एकत्र जमविल्या; आणि या नाठाळ आणि आडदांड मुलीची त्यांच्यापुढे खूप खरड काढली. शेवटीं बायबलांतील एक प्रकरण त्यांनी वाचून दाखविलें, आणि त्या धार्मिक आवेशानें म्हणाल्या, "पोरी, तूं नरकांत खितपत पडशील." सुसान आपल्या मनांत म्हणाली, "बरं! पडलें तर पडलें. माझ्याबरोबर तुम्हींहि साऱ्या जणी तिथेंच असाल." मास्तरीणबाईचा आग्रह असा कीं, नीति, सद्गुण आणि विनम्रपणा हे सनातन गुण मुलींनीं
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९९
Appearance