खनिजांतून बाकीची सारीं द्रव्यें बाजूला काढली पाहिजेत; आणि काय उरतें तें पाहिलें पाहिजे, असें तिनें ठरविलें. अधिक शोधान्तीं दिसून आलें कीं, जें नवें मूलद्रव्य आहेसे आपल्याला वाटतें, तें फारच थोडें असलें पाहिजे; आणि खनिजाच्या कांही टक्क्यांतच हे अपेक्षित द्रव्य असले पाहिजे. पिच-ब्लेंड तपासतांना दिसलें कीं, हें द्रव्य सर्वभर पसरलेलें नाहीं; व रेडिओ ॲक्टिव्हिटी या खनिजाच्या दोन अवयवांत सांठून राहिलेली आहे. म्हणजे मूलद्रव्यें एक नसून दोन असली पाहिजेत. असें तिनें ठरविलें. १८९८ च्या जुलै महिन्यांत यांतलें एक मूलद्रव्य तिच्या हातीं लागलें; आणि त्याचें नांव, आपल्या देशाचें स्मरण म्हणून, तिनें 'पोलोनियम' असें ठेवलें. पण तिला हवें होतें तें द्रव्य मात्र हें नव्हतें. या सर्व कामांत तिच्या नवऱ्याचें काम तिच्या बरोबरीनें चाले. हे द्रव्य फार थोडें सांपडतें, म्हणजे किती थोडें, हें तिच्या लवकरच लक्षांत आलें. पण पिन्च-ब्लेंडमध्यें हें एक दशलक्षांशाइतकें कमी असतें. कदाचित् कित्येक खंडी पिच-ब्लेंड आतां संशोधनासाठी हवें होतें. बोहिमियांतील कांचकारखान्याच्या बाहेर याचा ढिगारा पडला होता; तो नांवापुरती किंमत देऊन मेरीनें मागविला; आणि शोधाचें काम सुरू झाले. १८९८ ते १९०२ पर्यंत म्हणजे चार वर्षे त्या दोघांनीं ही कढई ढवळण्याचे काम सारखें चालविलें होतें. शेवटीं नवरा थकून गेला. तथापि बायकोच्या श्रमाकडे बघून तो थोडी थोडी मदत करत असे. होतां होतां पिचब्लेंडमधील बाकींचीं द्रव्यें नष्ट होऊन शुद्ध स्वरूपाचे मणी तयार होऊं लागले; आणि त्यांची तकाकी जास्तच दिसुं लागली. पण बाकीचें सारे रसायन टाकून देऊन या मण्यांचेंच नवें रसायन तिनें चालू केलें. शेवटीं, रेडियमची कल्पना आल्यानंतर पंचेचाळीस महिन्यांनीं, मेरीला प्रत्यक्ष रेडियमचा शोध लागला. अत्यंत शुद्ध स्वरूपाची, एका गुंजेइतकी रेडियम या सगळ्या परिश्रमानंतर तिच्या हाती लागली. तिनें ते रेडियमचे मणी कांचेच्या पेटींत ठेवले; प्रयोगशाळेत अंधार केला, तो ती पेटी चकाकूं लागली! नवऱ्याला तिनें आंत बोलावून आणले; आणि मग ते चमकणारे रेडियमचे मणी पाहून नवराबायको हर्षोत्फुल्ल होऊन गेलीं. १९०४ सालीं या शोधाबद्दल दोघांना नोबेल प्राइज मिळालें. एक नवें मूलद्रव्य पेरींनीं शोधून काढलें होतें.
पुढें तीनच वर्षांनी पेरी क्यूरी गाडीच्या अपघातानें एकाएकी मरण पावला. मेरीच्या दुःखाची कल्पना सहज करतां येते. पण तिनें आपलें लक्ष संशो
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
कर्तबगार स्त्रिया