हेन्री बेकेल यानें युरेनियम या धातूचे क्षार हा संशोधनाचा विषय बनविलेला आहे. त्याचें संशोधनाचें ध्येय कांहीं निराळेच होतें; पण त्याला सहजगत्या आढळून आलें कीं, उजेडाचा झोत नसतांनासुद्धां युरेनियमच्या क्षारांतून किरण आपोआप बाहेर पडतात. पण हे किरण कसले आहेत, हें मात्र त्याला समजेना. कदाचित् सूर्याचे किरण या क्षारांत जिरलेले असल्यामुळे युरेनियममधून हे किरण बाहेर पडत असावे, म्हणून त्याने या धातूचे क्षार कित्येक महिने अंधारांत ठेवून पाहिले, तरी किरण पहिल्यासारखेच बाहेर पडतात, असें दिसून आलें. हेन्रीनें सारी हकीगत आपल्या इतिवृत्तांत दिली होती. मदाम क्यूरी आणि पेरी या दोघांचेंहि लक्ष या चमत्काराकडे लागून राहिलें; आणि यांतूनच पुढें रेडियमचा शोध जन्मास आला.
युरेनियमच्या क्षारांतून प्रकाश बाहेर पडतो म्हणजे तरी काय, असा प्रश्न या दोघा पेरींना पडला; आणि पीएच. डी. च्या पदवीसाठीं हाच विषय घ्यावा, असें मेरीने ठरविलें. शोधतां शोधतां तिला असें दिसलें कीं, युरेनियम जास्त जास्त घ्यावें, तों तों हा प्रकाश अधिक भडक होत जातो, हा प्रकाश मोजतांसुद्धां येतो. आणि युरेनियम दुसऱ्या कोणच्या द्रव्याशीं निगडित झालें असलें, अथवा उजेड व हवामान यांत फरक पडला, तरी त्या प्रकाशांत कसला फरकहि होत नाहीं. जास्त अभ्यासानें कळून आलें कीं, या किरणांसारखे किरण दुसरीकडे कोठेंहि आढळत नाहींत. पुढील टप्पा तिनें गांठला, तो हा कीं, हा प्रकाश म्हणजे एक अणुधर्म असावा. अधिक अभ्यासानें कांहीं दिवसांनीं दिसून आलें कीं, असाच प्रकाश थोरियम या मूलद्रव्यांतूनसुद्धां बाहेर पडत असतो. ज्या पदार्थात युरेनियम किंवा थोरियम या धातू असतात, ते पदार्थ किरणोत्सर्गी (Radio-active) असतात. इतर पदार्थ Radio-inactive असतात. पुढला बारीकसा शोध म्हणजे युरेनियम किंवा थोरियम या धातूंचें परिमाण जर कमी असले, तर ही किरणोत्सर्गी क्रिया (Radio-action) जास्त भरते! वीस वेळां तिनें तपासून पाहिलें; आणि मग निश्चय झाला कीं, तपासावयास घेतलेल्या खनिजांत ज्या मानानें युरेनियम किंवा थोरियम आहे, त्या मानानें पाहतां, त्या खनिजांतील रॅडिएशन म्हणजे प्रकाशोद्भव जास्त लकलकीत असतो. हा लकलकीतपणा कोठून येतो, असा प्रश्न पुढें उभा राहिला. तेव्हां तिनें मनाशीं ठरविलें कीं, अजून माहीत नाहीं, असें एखादें मूलद्रव्य या खनिजांत असले पाहिजे. प्रयोग कर करून परीक्षेसाठीं घेतलेल्या
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मादाम क्यूरी
९१