Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिनें स्त्रीजातीचें मुख रेडियमइतकेंच उजळ केलें!


मादाम क्यूरी : ९:


 मादाम क्यूरी ही पोलंडमध्ये १८६७ साली जन्मली. तिनें एका फ्रेंच शास्त्रज्ञाशी लग्न केलें, म्हणून तिला फ्रेंच समजतात, इतकेंच. क्यूरीचें माहेरचें नांव मार्जा असें होतें. तिचा बाप कॉलेजांत भौतिक शास्त्रे शिकवीत असे. परंतु त्याची घरची गरिबीच होती. शास्त्रज्ञाला कांहीं किंमत असते, आणि म्हणून त्याला सांपत्तिक स्वास्थ्य उत्पन्न करून द्यावें, हें पहिल्या पहिल्यानें युरोपांतसुद्धां फार थोड्या सरकारांना कळत असे. त्यांतून पोलंडवर तेव्हां रशियाचें राज्य होतें. झारच्या करड्या अंमलाखाली पोलिश जनता अगदीं बेजार झाली होती. पोलिश जनतेला दारिद्र्यानें गांजलें होतेंच; पण तिची पोलिश भाषासुद्धां मारून टाकण्याचें झारचे यत्न चालले होते. पोलिश लोकांच्या कत्तली सुद्धां होत असत; आणि या कत्तली करावयास झारला थोडेंसुद्धां कारण पुरत असे. म्हणजे स्वदेशांतच पोलिश लोक चोर झाले होते. मार्जाला लहानपणापासून वाटे कीं, आपणही शास्त्राभ्यासच करावा; पण हें पोलंडमध्ये रहाणें नको. घरची गरिबी; म्हणून तिनें एका श्रीमंताच्या घरीं मुलें सांभाळण्याचे काम पत्करलें. ज्या मुलीला तिनें सांभाळण्याचें काम चालू केलें, तिचा एक मोठा भाऊ होता. त्याचें मन मार्जावर बसलें. मार्जाही त्याला नाहीं म्हणेना. हळू हळू यांच्या प्रेमसंबंधाची वार्ता मालकाला कळली. आणि मग तीं श्रीमंत नवरा-बायको रागानें अगदी बेफाम बनली. एका दरिद्री मुलीशीं आपला मुलगा लग्न करतो म्हणजे काय, असें म्हणून त्यांनीं मार्जाला नोकरीवरून काढून टाकलें. मार्जानें नोकरीचे थोडेसे पैसे गांठीला बांधले होते, ते घेऊन ही अवमानित मुलगी शास्त्राभ्यासासाठी पॅरिसला आली.
 पॅरिस शहरांत अनेक मोठाले शास्त्रज्ञ होते व संशोधकहि होते. मार्जानें त्यांच्या हाताखाली बी. ए. ची पदवी मिळविली; आणि तिची हुशारी तेथील शास्त्रज्ञांच्या मनांत चांगलीच भरली. ती एम्. ए. चा अभ्यास करूं लागली. परंतु प्रयोग करून पाहण्याला तिला पुरेशी जागा सांपडेना; कारण तिची राह