Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फ्रॅन्सिस विलर्ड
८७
 


कपडे गोळा केले, धान्य जमवलें; आणि औषध-पाण्याच्या बंग्या बरोबर देऊन तिनें आपले दूत आर्मेनियाकडे धाडले. आपल्या सरकारच्या मागे लागून तुर्की सरकारला जरब देण्याच्या कामांतहि तिनें यश संपादन केलें.
 पण आतां फ्रॅन्सिस् थकूं लागली. चळवळीचा धडाका चालू होता, तेव्हांसुद्धां ती कधीं पगार घेत नसे; आणि घेतला तर केवळ आमटी-भाकरीपुरता घेत असे. यामुळे तिच्या शरीरावर अतिश्रमाचा परिणाम त्वरेनें होऊं लागला; आणि तिनें अंथरूण धरलें. या आजारांतच तिनें तीन महिन्यांत बाराशे पानांचें आत्मचरित्र लिहून काढलें. थोडासा हवापालटहि तिनें केला; पण चांगल्या हवेलासुद्धां तिचें शरीर जाब देईना. होता होतां ती अगदीं क्षीण झाली; आणि शेवटी म्हणाली कीं, 'आतां दुसरें कांहीं तरी काम केलें पाहिजे; पण... पण तें दुसऱ्या जगांतच होईल!' इतकें बोलून एकाद्या झंझावाताप्रमाणें आपल्या देशांत लोकांच्या बऱ्यासाठीं घोंघावत फिरणारी ही पराक्रमी स्त्री परलोकच्या द्वारांत गतप्राण होऊन पडली!

● ● ●