प्रार्थना करूं लागली. तिनें परमेश्वराचें आवाहन करावें, डोळ्यांत आसवें आणावीं, आणि 'आपल्या आया-बहिणींना पशूसारखे वागवू नका' असें म्हणावें. तिच्या मैत्रिणीहि याच पंथांत शिरल्या; आणि त्यांनीं पुरुषांना अगदीं लाज आणली. पुरुष खजिल होऊं लागले; आणि दारूची दुकानें भराभर बंद पडूं लागली. फ्रॅन्सिसची आई म्हणे, 'आपण गरीब आहों; पण तू पैसा मिळवण्याच्या नादी लागू नकोस. आम्ही आमचे घरांत कसेंतरी भागवूं; तू या पुरुषाच्या जातीला गुत्त्यांतून उठीव.' आईच्या प्रोत्साहनाने निभ्रान्त बनलेली फ्रॅन्सिस् म्हणजे पुरुषांच्या मद्यमोचनाची निशाणीच बनली.
मागें सांगितलेंच आहे कीं, गरिबांच्या दारिद्र्याचाहि तिला उद्वेग वाटूं लागला होता. पण हें दारिद्र्य बहुतांशीं दारूमुळे उत्पन्न होत आहे, हे तिनें ओळखलेले असल्यामुळे तिनें पहिला सोटा बाटलीवरच मारला. पण आणखी विचार करतां करतां तिला दिसूं लागलें कीं, दारूमुळे लोक गरीब होत आहेत हें जितकें खरें, त्यापेक्षां गरिबीमुळ लोक दारू पीत आहेत, हें जास्त खरें आहे. गरिबीची जाणीव विसरावी म्हणून लोक दारू पितात, हे मत एकदां पत्करल्यावर मजुरांची गरिबी कारखानदारांच्या लोभामुळें उत्पन्न होतें, हेंहि तिच्या ध्यानांत आलें; आणि म्हणून मजुरांच्या संघटनेचें काम तिनें सुरू केलें. या संघटनेच्या कामांत तिनें विलक्षण यश मिळवलें. दहा लक्ष मजूर तिच्या संस्थेचे सभासद झाले. हे सर्व मजूर नाना पंथाचे आणि नाना जातींचे होते.
याच वेळीं बायकांना मतदानाचा हक्क मिळावा, या प्रचाराचाहि धुमधडाका तिनें उडवून दिला. बायकांना मतदान मिळालें, म्हणजे पुरुष वठणीवर येतील, आणि सध्यांचींच घरें अधिक सुखी होतील, असा तिचा ठाम सिद्धांत होता.
अमेरिकेंत आपली चळवळ चांगलीच फोफावली आहे हें पाहतांच, दारुबंदी, मजूर-संघटण, आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार या तीन मुद्यांवर तिनें एक मोठा जाहिरनामा काढला; आणि पन्नास भाषांत त्याचीं भाषांतरें करून पृथ्वीवरील सर्व सरकाराकडे तिनें तो पाठवून दिला. परमेश्वराचें न्यायाचें, सत्याचें आणि सद्गुणाचें राज्य सर्वत्र सुरू व्हावें, अशी आपली इच्छा असल्याचें तिनें त्यांत जाहीर केलें.
तुर्की सरकारने आर्मेनियन लोकांची कत्तल चालविलेली आहे, हें वर्तमान प्रासद्ध होतांच निराश्रित आर्मेनियन्ससाठीं तिनें एक मोठा निधि उभा केला,
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
कर्तबगार स्त्रिया