अर्थातच फ्रॅन्सिस् सारख्या मानी मुलीला हा पंक्तिप्रपंच अतिशय अपमानकारक वाटू लागला. तिची बहीण तिला म्हणाली, 'ताई, तूं म्हणतेस तें खरें; पण असं कांहीं बोलूं लागलें, कीं 'पोरी माजल्यात आहेत' असें लोक म्हणूं लागतात. 'फ्रॅन्सिस् गुरगुरून उत्तरली, 'हो! हो! मी माजल्यें आहे, असंच त्यांना दाखवून देत्यें.'
लवकरच बापानें तिला नॉर्थ वेस्टर्न वुइमेन्स् कॉलेजमध्यें घातलें. तेथें तिला सारें नवे जग दिसूं लागलें. ही खेड्यांतून आलेली; हिचा आवाज भसाडा असलेला, हिला नागर चालिरीतीची नरमाई माहीत नसलेली; बाकीच्या पोरी तिच्याकडे थोड्या उपहासानें पाहूं लागल्या. कोणी कोणी तर तिची टवाळीच करूं लागल्या. त्याबरोबर फ्रॅन्सिसनें एकदोघींना असे रट्टे लगावले, कीं बाकीच्या मुली चूप होऊन राहिल्या. आपल्या केसांचा रंग हा एक मोठा टीकेचा विषय बनत आहे असें पाहतांच तिनें एके दिवशीं केस कापून टाकले. कॉलेजांत तिच्यापुढें कोणाची मात्रा चालेनाशी झाली. शिक्षक मंडळी सुद्धां फारशी तिच्या वाटेस जात नसत. ही कोणाला काय बोलेल, याचा नेम नसल्यामुळे जो तो आपली अब्रू संभाळून असे. ती पुढे मोठी झाली. त्यामुळे तिच्या लहानपणच्या वांडपणाचें कौतुक करण्याची चाल पुढें पडली. जर कां ती चार-चौघींसारखीच निवटली असती तर, तिचे हे विद्यार्थिदशेतले चाळे मूर्खपणाचेच ठरले असते. एकदां तर ती दारें लावून वर्गात विड्याच ओढत बसलेली सापडली; पण लौकरच तिच्या ध्यानीं आलें कीं हा आडदांडपणा आणि हे चाळे सोडले पाहिजेत.
चार-सहा महिन्यांत ती इतकी निवळली, कीं वर्गातली सगळ्यांत शहाणी मुलगी म्हणजे ही असे शिक्षक म्हणू लागले. तिला त्यांनीं कॉलेजच्या वृत्तपत्राची संपादिका नेमलें, वाक्सभेचे अध्यक्ष केले; आणि स्त्री-पुरुष विद्यार्थ्यांची जीं सामाजिक संमेलने भरत, तीं चालवण्याचें जबाबदारीचें काम त्यांनीं तिच्याकडे दिलें.
होता होतां या साऱ्या चळवळींचा परिणाम इतका झाला, कीं ती नवज्वरानें आजारी पडली; आणि तिचा परीक्षेचा अभ्यास करणें तसेंच रेंगाळत पडलें. त्यांतच मध्यंतरी तिची बहिण क्षयानें वारली; आणि फ्रॅन्सिसचें शिक्षण शेवटीं संपुष्टांत आलें. तथापि पीटर्सबर्ग फिमेल कॉलेजमध्ये तिला शिक्षिकेची जागा मिळाली.
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/८८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
कर्तबगार स्त्रिया