राहून आपलें जमत नाहीं, असें ढळढळीत दिसूं लागल्यावर त्यानें एके दिवशीं आपले सामानसुमान आवरले आणि गाडी भरून, त्यावर आपली मुलें- माणसें बसवून हा साहसी माणूस पश्चिम दिशेने निघाला.
मुलांना कांहींच कळत नव्हतें. सामानाच्या ढिगावर बसून आपण गाडींतून चाललो आहों, याचीच फ्रेंन्सिस् आणि तिचीं भावंडे यांना मौज वाटत होती. गाडी म्हणायचे इतकेंच; पण तो गाडाच असला पाहिजे! जिकडे जिकडे हे साहसी लोक जाऊं म्हणतील, तिकडे तिकडे कोणी वाटा तयार करून ठेविल्या होत्या, असें थोडेच आहे? सपाटी पाहून पाहून आपल्याला हवें आहे त्या ठिकाणीं जाऊन पोहोंचणे, एवढेच काय तें त्यांना करतां येण्यासारखे होतें.
रानचा वारा म्हटला तरी तो दरवेळीं मोठा हितकारकच असतो, किंवा वसाहतीची उघड्यावरील जागा नेहमीं निरोगीच असते, असें कसें म्हणतां येईल? शिवाय, रोगाचीं बीजें माणसें स्वतःच्या शरीराबरोबरहि घेऊन जातात. वस्तीचा थारेपालट करीत पश्चिमेकडे जातांना आपल्या घरांत क्षयाची बाधा शिरली आहे, असें विलर्डला दिसून आलें. फॅन्सिसची एक बहीण क्षयानें प्रत्यक्षच आजारी पडली. हवा मानवत नाहीं, हें पाहून आणखी पश्चिमेकडे जाण्याचें विलर्डने ठरवलें; आणि हाडे खिळखिळीं करणारी भ्रमन्ती पुन्हां पंधरा-तीन- वार केल्यानंतर ही मंडळी विस्कॉन्सिस परगाण्यांतील रॉक् नदीच्या कांठीं एका टेकाडावर येऊन पोहोंचलीं.
सध्या हा सारा प्रदेश माणसांनी गजबजून गेलेला आहे, आणि आधुनिक संस्कृतीच्या खुणा तेथें पावलों पावलीं दिसून येतात; पण सुमारे शंभर वर्षापूर्वी हा मुलूख केवळ उजाड होता. ज्याचें मन निर्भय असेल, ज्याच्या दंड-मांड्यांत बळ असेल, ज्याची बायको हरतऱ्हेचे कष्ट उपसायला सिद्ध असेल, आणि ज्याचीं पोरें बलदंड आणि खेळकर असतील, त्यालाच इकडली वस्ती मानवण्यासारखी होती.
जोशुआ विलर्ड ही आसामी अशाच प्रकारची होती. चार फाटी आणि दगड-धोंडे गोळा करून त्यानें येथें एक घर बांधलें, आणि भोवतालचा टापू हळू हळू नांगराखाली आणला. जमिनीनें उत्तम जाब दिला; आणि जोशुआचें अंबार कसदार धान्याने भरून जाऊं लागलें. पांचापैकीं तीन पोरें शिल्लक राहिलीं; दोन देवाघरीं निघून गेलीं. दम न सोडतां, प्रयत्नाच्या बळावर जोशुआनें ही रानटी भूमि वठणीवर आणली; आणि आपला सुखाचा संसार येथें उभा केला.
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/८५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फ्रॅन्सिस विलर्ड
८१