दचकल्याच. त्या म्हणाल्या, 'मी विश्रान्तीसाठीं आलें, पण येथें पहात्यें तों हे मला सगळीकडे हिंडवणार आणि माझ्याकडून पुष्कळ काम करवून घेणार असें दिसतें!' पण अवलोकन आणि सूक्ष्म अभ्यास हाच बाईचा हव्यास असल्यामुळे हें पुढें वाढून ठेवलेलें कामहिं सुहास्य करून त्यांनीं हातीं घेतलें.
त्या प्रथम अहमदाबादला गेल्या. तेथील संस्थांची पाहणी करून तेथील प्राणीसंग्रहालय त्यांनीं पाहिलें. तेथील माकडें, खारोट्या आणि वाघ यांच्या वाकुल्या पाहून त्यांना फारच मौज वाटली. परंतु हिरव्या रंगाचे, लाल चोचींचे आणि काळा गळपट्टा घातलेला पोपट पाहून तर त्या हर्षभरितच होऊन गेल्या. तेथल्या वडांसारखी विस्तीर्ण झाडें त्यांनीं कधीं पाहिलींच नव्हतीं. सुरतेच्या मुक्कामांत बाईचा फारच गौरव झाला. त्यांना दिलेल्या मानपत्रांत 'मातुःश्री' असें संबोधन केलें होतें. स्वतःचें लग्नहि झालेलें नसतांना ज्या स्त्रीनें सहस्त्रावधि मुलांमुलींचा प्रतिपाळ केला, ज्यांना कोणी त्राता नाहीं, आणि जीं मुलें माणसाच्या जातींतून कायमचीं उठलीं असतीं, त्यांना वात्सल्यबुद्धीनें जिनें जवळ केलें, तिला सुरतेच्या स्त्रियांनीं 'मातोश्री' म्हणून संबोधावें हें सर्वथा युक्तच होतें.
यानंतर मुंबईच्या कांहीं संस्थांची पाहणी करून त्या पुण्यास आल्या; आणि पुढें मद्रासकडून कलकत्त्याकडे गेल्या. गव्हर्नर जनरल सर जॉन लॉरेन्स यांनीं आपल्या राजवाड्यांतच त्यांना राहवून घेतलें; आणि कलकत्ता शहरांतील सर्व संस्था त्यांना दाखवल्या. बाईच्या संबंधानें तेव्हां वर्तमानपत्रांत आलेल्या एका लेखांतील लहानसा उतारा येथें उद्धृत करतों. लेखक म्हणतो:—
"कुमारी कार्पेंटर यांच्या संबंधानें पुरेसें लिहिणें माझ्या शक्तीच्या बाहेरचें आहे. बाईंची आस्था आणि त्यांच्या चालिरीतींतील सौजन्य ही पाहून हिंदुस्थानांतील लोक अगदीं खुष होऊन गेलेले आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल त्यांना अतिशय आदर वाटू लागला आहे. शांति आणि प्रगति हें बाईंचें ध्येय; आणि या बाबतींत त्यांच्या हातून जें होईल असे वाटत होतें तें प्रत्यक्ष होऊन चुकलें आहे. त्यांची चालरीत आणि त्यांची संभाषणाची पद्धत यांचें अनुकरण सर्वच राज्यकर्त्या अधिकारी मंडळींनीं करावयास हवें. वास्तविक पाहतां, बाई परकीय देशांत आलेल्या आहेत; पण त्या जेथें जातील तेथें लोक त्यांच्या भोंवतीं गोळा होतात. बाईचें
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/८२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
कर्तबगार स्त्रिया