घराण्यांनी या इमारतींत वस्ती केली होती. इतकेंच काय पण येथें एक 'सिंहासन मंदिर' म्हणून सुद्धां होतें. अशी ही झोंकबाज इमारत लॉर्ड बायरनच्या बायकोनें या कामासाठीं मेरीला घेऊन दिली. मेरीचा इतमाम केवढा वाढला पहा.
मेरी कार्पेंटर हिनें स्वतः अशा मुलींच्या शिक्षणाचा हेतु काय, हें स्पष्ट करून सांगितलें. 'या मुलींच्या शारीरिक व मानसिक शक्तीची योग्य जोपासना करावी, म्हणजे त्यांना घरगुती नोकरी करून पोट भरतां येईल; आणि जर त्यांना लग्न करतां आलें, तर आपले स्वतःचे संसार नीट थाटतां येतील' असें मेरीला वाटत असे. म्हणून, धुणें, स्वयंपाक करणें, विणकाम करणें इत्यादि कामें त्यांना शिकविण्याचा उपक्रम तिनें केला. त्यांची रुचि चांगली सुसंकृत बनावी, म्हणून त्यांना गाणे शिकविण्याची व्यवस्था करण्यांत आली. कांहीं कांहीं मुलींना चटोरपणाचीं गाणीं आधींच म्हणतां येत असत. मेरीनें हीं गाणीं एकदम बंद केलीं; आणि त्यांना संभावित पदें शिकविलीं. लिहिणें-वाचणें हें अर्थातच रोजच्या कार्यक्रमांत होत असे. परंतु एवढ्यानेंच भागण्यासारखे नव्हतें.
'शिकण्यापेक्षां विसरणें जास्त अवघड असतें' असें म्हणतात, तें कांहीं खोटें नाहीं. या मुलींच्या जुन्या संवयी घालवणें, हें मोठें कष्टाचें आणि नाजूक काम असे. मुलींना आपला वचक तर वाटला पाहिजे, पण आपल्या संबंधानें त्यांच्या मनांत भीति उत्पन्न होतां उपयोगाची नाहीं; त्यांना शिस्त लागावी, पण आपण कैदी आहों असें त्यांना वाहूं नये; अशी वागणुकीची ढब मेरीला ठेवावी लागे. या शिक्षणाचा परिणाम योग्य तोच झाला. कांहींशा बेताल बनत चाललेल्या या मुली निःसंशय चांगल्या मार्गावर आल्या; आणि मग कांहीं मोठ्या लोकांच्या घरीं कामधंद्याला राहूं लागल्या. 'सुस्वभावी आणि नीतिमान' असें त्याच मुलींचें वर्णन होऊं लागलें; व कांहींना तर चांगले नवरेहि मिळाले आणि त्यांच्या संगतींत मोठ्या सुखानें त्यांनीं आपले संसार केले. अर्थात् कांहीं थोड्याशा मुली तुपात तळल्या आणि साखरेत घोळल्या, तरी कडू कार्ल्याप्रमाणें कडू राहिल्या! १८६२ ते ६५ या चार वर्षात या रेड् लॉजमधून सत्तर मुली बाहेर पडल्या. यांपैकीं साठ मुली आपला जीवनक्रम सचोटीनें चालवू लागल्या; आणि यांतल्या कांहींनीं तर समाजांत मोठे मानाचें स्थान मिळवलें.
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/८०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
कर्तबगार स्त्रिया