व्हावयाचें होतें. पण त्या कल्पनेचें बीजारोपण राममोहन यांच्या सहवासानें तिच्या मनांत झालें हें खरें.
१८६६ त राजा राममोहन रॉय यांच्या 'इंग्लंडांतील शेवटचे दिवस' या ग्रंथाचे संपादन तिनें केलें. ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेंत रॉय यांच्या संबंधाची आपली आदरबुद्धि तिनें ठिकठिकाणीं प्रकट केली आहे. धर्म आणि सदाचार यांच्या प्रसारासाठीं, रॉयनें केलेल्या प्रयत्नांचा तिनें मोठाच गौरव केला आहे; आणि त्याची गुणाढ्यता व त्याचे शुचिष्मंत चरित्र यांविषयीं गाढ आदर प्रकट केला आहे. बापाने दिलेल्या धर्मशिक्षणाच्या खालोखाल राममोहन याच्या उदात्त सहवासाचा आणि मताचा मेरीच्या मनावर फार मोठा परिणाम झाला असला पाहिजे.
मेरीचें स्त्रीशिक्षणाचें काम चालूच होतें. डॉ. कार्पेंटर याची प्रकृति आतां अगदीं बिघडली. हवा पाणी बदलावें, म्हणून इंग्लंडांत तो अनेक ठिकाणीं जाऊन राहिला; पण प्रकृतीला कोठेंच आराम पडेना. शेवटीं वैद्यांनी सांगितलें कीं, दक्षिण युरोपांत कोठेतरी जावें. बापाचें दर्शन पुन्हां होईलच, अशी शाश्वति मेरीला नव्हती. मेरीला या वियोगाच्या वेळीं अत्यंत दुःख झालें. पण डॉ. कार्पेंटर याचा अंत निराळ्याच तऱ्हेने व्हावयाचा होता. नेपल्समधून लेगहॉर्न इकडे जातांना, जहाजावरून तो समुद्रांत पडला. दोन महिन्यांनीं त्याचें प्रेत किनाऱ्याला लागलें! तेव्हां त्याचें खरोखरी काय झालें हें सर्वांना कळलें.
आतां या साऱ्या मुली पोरक्या झाल्या. पोरकें होणें म्हणजे काय, हें मेरीच्या ध्यानांत आलें. पण आपल्याला एकविसावें वर्ष लागलें, तेव्हां बापानें कोणचा उपदेश केला होता, याचें तिला पक्के स्मरण होतें. जे कोणी पोरके असतील, पण यांना परमेश्वरानेंच उत्पन्न केलेलें असतें, त्यांची सेवा करावी, हा भाव तिचा मनांत उदित झाला; आणि आपले भावी जीवित याच कार्यात व्यतीत करावें, असें तिनें ठरविलें.
या वेळी इंग्लंडांत उपरी बनलेल्या आणि उनाडक्या करीत फिरणाऱ्या मुलांना ताळ्यावर कसें आणावें, त्यांना हातीं धरून शहाणे करून सन्मार्गाला कसे लावावें, या विषयींची चर्चा विचारवंतांत आणि मुत्सद्यांत चालली होती. ती वाचीत असतांना, मेरीच्या मनाला वाटू लागलें कीं, आपण याच कामांत पडावें; हीं
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मेरी कार्पेंटर
७३