जीवित घालवावे, असे मला वाटतें तूं स्वतःचा उद्धार करून घ्यावास, आणि कसलाहि दिमाख न दाखवितां परमेश्वराने निर्माण केलेल्या मानवांची सेवा तूं मनापासून करावी अशीहि माझी इच्छा आहे."
डॉ. कार्पेंटर हळूहळू थकूं लागला, आणि त्याचा नित्याचा व्यवसाय त्याच्या हातून होईना. प्रपंच कसा चालवावा असा प्रश्न पडला. तेव्हां मेरी आणि तिच्या दोन बहिणी यांनी ठरविलें कीं, आपण एक स्त्रीशिक्षणाची शाळा चालवावी. मुलींची आईहि या कामी त्यांना साहाय्य करावयास सिद्ध झाली. तिलाहि थोडे शिवणें, टिपणें, विणणें इत्यादि कामें येत असत; आणि स्त्री- शिक्षणांत या गोष्टी अवश्य मानल्या जात. अर्थात् आई आणि मुली या चौघींनीं मिळून शाळा सुरू केली; आणि डॉ. कार्पेंटरच्या प्रपंचाचा गाडा त्या मोठ्या तरतुदीनें हाकूं लागल्या. मुलींना असें दिसूं लागलें कीं, आपण शाळा काढली खरी आणि आपण शिकवितोंहि, पण शिक्षणाच्या व्यवसायांतील खरें कसब अजून आपल्याला लाभलेलें नाहीं. तें हस्तगत करण्यासाठीं त्या चारसहा महिने पॅरिसला जाऊन राहिल्या; आणि मग स्त्रीशिक्षणाची शाळा कशी चालवावी, हें त्यांना जास्त चांगलें समजूं लागलें. शाळा लवकरच भरभराटीला आली. लॅटिन, ग्रीक या पुराणभाषांचें शिक्षणहि या शाळेत मिळत असे. पण मुख्य म्हणजे कार्पेंटर यांच्या कुटुंबांत चालत आलेली जी समाजसेवेची आवड, ती सर्व विद्यार्थिनींच्या मनांत रुजत राहिली. या शाळेतून बाहेर पडलेल्या कांहीं मुलींनीं पुढें आपलें प्रपंचाचें काम सांभाळून गरीब व अज्ञान लोकांना शिकविण्याचें काम चालू केलें. कांहींनीं आदर्श प्रपंच कसे करावे, हें तेव्हांच्या लोकांना दाखवून दिलें; आणि कांहीं कांहीं तर सार्वजनिक जीवितांत आपल्या कर्तृत्वानें चांगल्याच मान्यता पावल्या. शाळेच्या चालकांचा असा एक ठाम सिद्धांत असे कीं, शिक्षणामुळे स्त्रिया प्रपंचाला नालायक होतात. हें मत खोटें ठरवावें, असा मुलींचा आग्रह असे. आया मात्र म्हणत कीं, इतकें थोरलें शिकून काय करावयाचे आहे? शिवणें, टिपणें, विणणें, आणि हिशेब- ठिशेब ठेवणें येवढें आलें म्हणजे पुरें!'
सुमारें पांच वर्षेपर्यंत मेरीचा हा शिक्षण देण्याचा उद्योग चाललेला होता. हिच्या मनांत कांहीं अकल्पित फरक पडेल, आणि हिच्या जीविताला कांहीं निराळें वळण लागेल, असें कुणालाहि वाटलें नाहीं. परंतु याच सुमारास एक अकल्पित
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मेरी कार्पेंटर
७१