पडली; आणि त्यांचा प्रेमसंबंध जुळून तिनें त्याच्याशीं लग्नही करून टाकलें. कॅथरीनच्या आईला असें वाटें कीं, पोरगी नाता तऱ्हेचें पाखंड बोलूं लागली आहे. एकदां तिच्या गळ्यांत संसाराची माळ पडली, म्हणजे ती शुद्धीवर येईल. अर्थात् लग्न झाल्याबरोबर ती म्हणाली, 'चला, माझा जीव आतां भांड्यांत पडला; आतां ही पोर मार्गाला लागेल.!'
कॅथरीननें लग्न केलें खरें पण या नवरोजीच्या संगतींत तिच्या क्रांतिप्रवण मनाला समाधान मिळेना. आपण नवऱ्याची बायको झालों असूं; पण लहानपणापासून आपण घेतलेला ध्यास शांत होण्याचीं लक्षणें या नवऱ्याच्या संगतींत सांपडत नाहींत, व तिची हें तिला चक्क दिसूं लागलें. लवकरच पीटर क्रोपोटकिन् या एका तरुण माणसाची गांठ पडली. हा क्रोपोटकिन् राजघराण्यांतील असून फार रूपसुंदर माणूस होता. घरचाही हा चांगला गबर होता. परंतु क्रांतीच्या कल्पनेनें तोही केवळ भडकून गेला होता. आपल्या जिंदगीवर त्यानें तुळशीपत्र ठेवलें, सरकारांतून मिळालेले सारे किताब त्यानें टाकून दिले; आणि तो गरीब लोकांत जाऊन राहूं लागला. गरिबांसाठीं फकिरी पत्करलेल्या अशा या माणसाची आणि कॅथरीनची गांठ पडली. त्याच्याशीं संभाषण चालूं झालें, म्हणजे भविष्यकालाचें खरें खरें चित्र कॅथरीनच्या डोळ्यासमोर उभे राही; आणि त्याच्या वक्तृत्वानें तिच्या मनाचे अणु-रेणू कंप पावूं लागत. दूर बसून शेतकऱ्यांना शिकवावें, एवढ्यानें भागण्यासारखें नाहीं, आपण त्यांच्यापैकींच झालें पाहिजे, हा प्रिन्स क्रोपोटकिन् याचा नवा संदेश कॅथरीनच्या कानीं आला; आणि तिनें ठरविलें कीं, आपल्या समाजाचा आणि इभ्रतीचा त्याग करून आपण शेतकऱ्यांशीं तन्मय होऊन जावें. तिनें आपल्या नवऱ्याला एके दिवशीं विचारलें कीं, 'मला आतां तत्सम होऊन जावयाचें आहे. मी आपल्या साऱ्या पीठिका विसरणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर प्रत्यक्ष शेतकरी जीवनांत प्रविष्ट होण्याला येतां काय?' नवरा म्हणाला, "तूं म्हणतेस तें कदाचित् आवश्यक असेल; पण माझ्या हातून ही गोष्ट होण्यासारखी नाहीं. मला हें झेंपायचें नाहीं."
नवऱ्याचें उत्तर ऐकून कॅथरीन् मनांत खट्टू झाली; पण तिनें ताडकन् उत्तर केलें कीं, "कांहीं हरकत नाहीं. तुम्ही बाहेर पडला नाहीं तर नाही मी मात्र आतां चाललें." या वेळीं तिचे दिवस अगदीं भरत आले होते. परंतु नवऱ्याचा आणि घराचा त्याग करून, क्रांतीची कल्पना अमलांत आणण्यासाठी ही तरणी
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/६७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कॅथरीन् ब्रेशकोव्स्की
६३