ढेंच त्यांना माहीत असे. कोणी देवाच्या नांवानें त्यांना हिणवलें, तर ते म्हणत कीं, 'आम्ही फक्त "पोटोबा" जाणतों, विठोबा जाणत नाहीं.' कांहीं कांहीं जमीनदार तर असे लफंगे बनले होते, की एकाच सुगीच्या सर्व धान्याचा सौदा ते अनेक व्यापाऱ्यांशी करीत. प्रत्येक व्यापाऱ्याकडून आनामत रकमा घेत, आणि शेवटीं धान्य कोणालाच विकत नसत. जर कोणी व्यापाऱ्यांनी तक्रार केली, तर ते त्याला पळवून नेत, आणि चाबकाखाली बेदम मारून काढीत. ऐदीपणामुळे यांचीं पोरेंहि सुस्त बनत आणि अर्धवट निवटत. पण असल्या अर्धववटांच्या सुखसोयीसाठीं हे लोक लाखों रुपये खर्च करीत. धडधाकट आणि बुद्धिमान पोरांच्या आईबापांना स्वाभाविकच वाटे कीं, असली मद्दड पोरें सुखांत रहात आहेत, आणि आपली चलाख मुले अर्धपोटीं काळ कंठीत आहेत. हीच तक्रार जर कां त्यांनीं उघडपणें केली, तर वरील व्यापाऱ्यांप्रमाणें त्यांच्याही पाठीं नरम होत असत. सुदैवाने कॅथरीन् ब्रेशकोव्स्की हिच्या आईबापांची सदसद्विवेकबुद्धि अजून जागृत राहिलेली होती. श्रीमंतीनें आणि सुखानें हे लोक कोडगे आणि बेपर्वा बनलेले नव्हते. गरिबांना आपल्यासारखाच जीव असतो, आणि त्यांनाही मनें आणि बुद्धि हीं परमेश्वरानें दिलेली असतात, हें त्यांनी ओळखलें होतें. इतकेंच नव्हें, तर त्याप्रमाणें त्यांची वर्तणूकही होत असे. कॅथरीनच्या अंगीं आईबापांचे हे गुण लहानपणापासूनच दिसूं लागले. देशांतील निराश्रित आणि गरीब लोकांनीं लष्करांत भरती व्हावें, नवीं नवीं युद्धे निघावीत, त्यांचें जीव जावें, आणि सरदारांनीं व सरंजामदारांनीं मागें राहून देशाभिमानाच्या गोष्टी कराव्या, हा सनातन प्रघात होता. जे कोणी अशा रीतीनें मरत, ते आपल्या जिवाला मुकत, त्यांचीं बायकापोरें उघडी पडत, आणि तिकडें सरदार-सरंजामदार देशाभिमानाचा डंका आपल्या वाड्याच्या मनोऱ्यावर वाजवीत बसत. कॅथरीनचे आईबाप याच वर्गातले असले, तरी आतांच सांगितल्याप्रमाणें त्यांची विचारशक्ति जागी झालेली होती आणि आपल्या लोकांच्या हातून कांहींतरी विपरीत घडत आहे, आपण पातकी आहोंत, या जाणिवेनें त्यांचें मन त्यांना सारखे खात असे. आपल्या आईबापांचें हें मानसिक दुःख कॅथरीनच्या ध्यानांत फार लहान वयांतच आलें होतें, आणि तिचा अंकुरही तोच असल्यामुळे तिच्या कोवळ्या मनाला या दुःखाचा चटका जास्तच तीव्रतेनें बसत असे. आपल्या आसपासचे मग्रूर श्रीमंत लोक नोकरचाकरांना आणि शेतावरच्या गुलामांना फटाफट फटके मारूं लागले, म्हणजे कॅथरीन् हिचें मन अगदीं कळवळून
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/६३
Appearance