मूल वांचलें. एकदां एक पंधरा सोळा वर्षाची इटॅलियन नवरी मुलगी या मंदिरांत धांवत आली आणि म्हणाली, नवऱ्याने दिलेली लग्नाची आंगठी माझ्या हातून गमावली; आणि म्हणून नवरा मला सारख्या शिव्या देत आहे.' जेननें त्या नवऱ्याला बोलावून आणलें. दोघांना बसवून घेऊन सौम्यपणानें त्यांना तिनें चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. अंगठीला लागणारें द्रव्य त्यांना दिलें, आणि ती त्या नवऱ्याला म्हणाली, 'आतां तरी तू हिला शिव्या देऊ नकोस.' नवरा-नवरी खूष होऊन जेनला दुवा देत मंदिरांतून बाहेर पडलीं! हळू हळू भोवतालच्या साऱ्या टापूंतील भांडणांचीं प्रकरणें तिच्याकडेच येऊं लागलीं; आणि मानवी मनाचे व्यापार नीट ओळखणाऱ्या या स्त्रीनें एका समजूतदार न्यायाधीशाची भूमिकाच आपल्याकडे घेतली. लोक म्हणत 'ही बाई श्रीमंत दिसते; पण गरिबांसारखीच अगदीं सरळ स्वभावाची आहे!'
लवकरच तिनें एक बालसंगोपन गृह काढलें. आसपासच्या टापूंतील बाया कामाला जात; तेव्हां त्यांच्या मुलांची फार आबाळ होत असे. या गृहांत आयांनीं आपली मुलें आणून सोडावीं, आणि कामावरून परत आल्यानंतर घरीं घेऊन जावीं, अशी व्यवस्था तिनें केली. मुलांची बडदास्त तिनें इतकी उत्तम ठेवली, कीं त्यांना परत घरी नेतांना, त्यांचीं सुहास्य वदनें पाहून आयांच्या मनाला आनंद वाटे. जेन म्हणे कीं, 'मी तुमची एक शेजारीण आहे; आणि म्हणून मी तुमच्या उपयोगी पडतें. याहून जास्त कांहीं नाहीं.' शेवटीं तिला 'भली शेजारीण' हेच नांव मिळालें; आणि 'शेजारधर्म म्हणजे सेवाधर्म' असा अर्थ लोकांच्या मनांत रूढ झाला.
चमत्कार असा कीं, शेजारधर्म, सेवाधर्म, परिचय- मंदिर या कल्पना शिकॅगो शहरांतून बाहेर पडून देशांतील इतर शहरांत भराभर पसरल्या. 'मित्रभावाचीं घरें' ठिकठिकाणीं स्थापन होऊं लागलीं. आतांपर्यंत एकमेकांपासून दूर रहात आलेले इटॅलियन, आयरिश, जर्मन हे सारे या मित्रेमंदिरांत एकत्र जमा होंऊं लागले; परस्परांना साहाय्य करूं लागले. अशा रीतीनें जेन अदाम्स हिच्या हस्तें एका नव्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा उदयच झाला.
वंशीय सामरस्याचें हें मंदिर उभारण्याचे काम पुरे झाल्यावर, जेननें लहान मुलांना सुखी कसें करतां येईल, याकडे आपले लक्ष वळवलें. त्या काळांत लहान मुलांना कामाला लावण्याची पद्धति अमेरिकेत होती. एकीकडे आमचें राष्ट्र
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
कर्तबगार स्त्रिया