लोक आहेत, ते येथेंच थांबत नाहीत. दुःखितांच्या दुःखाचा परिहार प्रत्यक्ष कृतीनें केला नाहीं, तर आपली सहानुभूति, भूतदया हीं सारीं कमी कसाचीं ठरतात, हें त्यांनी ओळखलेलें असतें; आणि म्हणून ते कामाला लागतात. जेन अशा लोकांपैकीच एक होती. लोकांची मानवता उन्नत करावयास हवी, आणि त्यांचा बंधुभाव वाढवावयास हवा, हें झालें तरच जगांत शांति आणि सुख ही नांदतील असा मनाचा निश्चय करून ही तरुण स्त्री कामाला लागली.
युरोप-अमेरिकेचे इतिहास ज्यांनीं थोडेबहुत तरी वाचले आहेत, त्यांना हें माहीत आहे कीं, अमेरिकेतील लोकवस्ती युरोप व आफ्रिका येथील निरनिराळ्या लोकांची आवक होऊनच बनलेली आहे. प्रथम प्रथम इंग्लंड व हॉलंड येथील कांहीं लोक तिकडे गेले; मग फ्रान्समधले गेले. असें होता होता, ज्यांना स्वदेश नकोसा झाला होता, आणि जे स्वदेशाला नकोसें झालेले होते, असे शेकडों लोक आपपल्या देशांतून ऊठून अमेरिकेत जाऊन राहू लागले. जमीन सुपीक आणि वाटेल तेवढी फुकट मिळण्यासारखी, म्हणून ज्यांना कष्ट करण्याची धमक होती, ते सारे तिकडे जाऊं लागले. त्यांतच मजुरीसाठी आणलेल्या निग्रो लोकांची भर पडली.
अमेरिकेत जमा झालेले हे युरोपियन लोक एका भूमींत आले खरे; पण तेवढ्याने ते एक झाले नाहीत. आपण आयरिश आहों, आपण जर्मन आहों, आपण पोलिश आहों, अशी जाणीव प्रत्येक गटाला असे. हे गट मिळून जरी एकादें शहर बनत असले, तरी त्यांचे निरनिराळे मोहल्ले असत; आणि ते परस्परांशीं थोडेसें बाकूनच वागत. त्यांत पुन्हां कोणी प्रॉटेस्टंट, कोणी कॅथॉलिक, कोणी क्वेकर अशा पंथोपपंथांचे लोक असत. त्यामुळे बारीक बारीक गटांच्यासुद्धां चिरफळ्या झालेल्या होत्या. सुखासमाधानानें जमीन पिकवून खावी, असें न करतां हे लोक एकमेकांशीं हमरी- तुमरीवर येत. यांत आफ्रिकेंतून आलेल्या त्या काळ्या निग्रोंची काय रया रहात असेल, याची कल्पनाच केलेली बरी! असल्या लोकांनी गजबजलेलीं शहरे आणि गांवें अमेरिकेच्या पूर्वभागांत भराभर वाढत चालली होतीं. प्रत्येक गांवांत आणि शहरांत जातींचीं भांडणें अगदीं उतू जात असत. शिकॅगो शहरीं तर निरनिराळ्या जातींच्या लोकांचा एक शिकारखानाच बनला होता! वास्तविक पाहतां, काळे निग्रो सोडून दिले, तर युरोपांतील निरनिराळ्या देशांतून आलेले लोक एकाच खिस्ती धर्माचे,
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जेन अदाम्स्
५१