असें जेनला प्रथम वाटले; पण पोटाचा डबरा भरण्यासाठीं याहि वस्तूंचा गरीब लोक उपयोग करीत असले पाहिजेत, हे तिच्या चटकन् ध्यानांत आलें. मग निद्रित असलेले तिचें मानवी औदार्य क्षणांत खडबडून जागे झालें. मानवप्राण्याची ती दुस्थिति तिला बघवेना. आपण चांगले चांगले खाणारे आणि लेणारे लोक पातकी आहों, असें तिला वाटूं लागलें. आत्मारोपाचा आवंढा तिनें गिळला. या मुलीच्या मनाची बैठकच साफ बदलली. पुढें कांहीं दिवसपर्यंत ती लंडन शहरींच राहिली; पण शहरांतून फिरतां फिरतां आपण असल्या एखाद्या ठिकाणी जाऊन पुन्हा पोहचूं कीं काय, असा धसका तिला वाटू लागला. असला देखावा पुन्हां पाहणें नको, आपल्याला तो सहनच होणार नाहीं, असें तिच्या मनानें पक्के घेतलें. जर कां कोठें हाल, विपत्ति, दारिद्र्य, हीं दिसलींच, तर चट्कन् गाडींतून खालीं उतरे आणि दुःखितांचा थोडाबहुत तरी परामर्श घेऊन ती पुढे निघून जाई.
हिंडतां हिंडतां ती स्पेन देशांत आली. माद्रिद येथें असतांना 'बैलाची टक्कर' पाहण्यासाठीं ती गेली. तो भयानक देखावा पाहून ती अगदीं थिजूनच गेली. पहावयास आलेल्या सर्व लोकांनीं भोंवतींच्या उंच जागांवर बसावें, आणि मधल्या विस्तीर्ण हौद्यांत एका पिसाळलेल्या बैलाची आणि एका चपळ पहिलवानाची चाललेली झुंज पहावी, असा हा टकरीचा प्रकार असे. करमणुकीसाठीं मातबर लोक दुसऱ्या गरजू माणसांना कोणच्या संकटांत नेऊन घालतात, पुन्हां पुन्हां टाळ्या वाजवून त्याच कामांत त्यांना कसें गोवितात, आणि जर कां हे चपळ पहिलवान बैलांच्या हुंदाड्यानें मरण पावले, तर 'आज मोठीच मैफल उडाली' असें म्हणत घरी कसें परत येतात, हें पाहून मानवी दुष्टाव्याचे तिला फारच आश्चर्य वाटू लागलें.
माणसांची मनें कशी सुधारतील, तीं एकमेकांशी प्रेमानें केव्हां वागू लागतील, आणि हरतऱ्हेचे भेदभाव विसरून परस्परांच्या साहाय्याला कधीं धावूं लागतील, या चिंतेनें जेनचें मन कष्टी होऊं लागलें. पुष्कळदां असें होतें कीं, दुसऱ्यांच्या हालानें आपलें मन फार कष्टी होत आहे, यांतच माणसें समाधान मानतात; दुसऱ्यांच्या दुःखांचा प्रत्यक्ष परिहार करावा, हे त्यांना भावतच नाहीं. दुसऱ्याचें दुःख पाहून आपल्याला दुःख झालें म्हणजे आपली मानवता फार उंच दर्जाची ठरली, असें त्यांना वाटतें; आणि तीं येथेंच विराम पावतात. पण जे खरे थोर
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/५४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
कर्तबगार स्त्रिया