Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बॅरनेस बर्डेट कूटस्
४५
 


याने त्या कुत्र्याच्या विश्वासूपणाचे आणि बर्डेटच्या रसिकपणाचे केलेलें वर्णन या स्तंभावर कोरलेले आहे.
 बर्डेट कूटस् हिच्या औदार्याची वार्ता हिक्टोरिया राणीच्या कानीं केव्हांच गेलेली होती. व्हिटोरियाला माहित होतें कीं, आपल्याजवळही जितका पैसा नाहीं तितका या बाईपाशीं आहे; आणि त्याचा उपयोग दुःखितांचा परामर्श घेण्यासाठी ती करीत आहे. तसेंच सर्व देशभर तिच्या नांवाचा जयजयकार चालू असतो, या गोष्टीचाही हिक्टोरियाच्या मनावर मोठाच परिणाम झाला; आणि म्हणून तिला बॅरनेस करण्याचे तिनें ठरविलें. ही वार्ता देशांत कळतांच राणीच्या या हेतूला सर्व संस्थांनीं आणि लोकांनी मोठ्या आनंदानें आपली पसंती दर्शविली; आणि १८७१ साली बर्डेट ही बॅरनेस (एक सर्वश्रेष्ठ मानकरी) झाली. याच वेळीं 'युवराजांच्या हस्ते 'देशांतील दोन नंबरची म्हणजे राणीच्या खालोखालची स्त्री' ही पदवी तिला बहाल करण्यांत आली. तुर्कस्तानच्या सुलतानानेंही 'मेजीदी' आणि 'शफाकत' अशा पदव्या तिला बहाल केल्या; आणि लोकही तिला लेडी कूटस् असें म्हणूं लागले. ज्या बाल्टिमोर परगण्यांतील लोकांना तिनें अनेक प्रकारच्या संकटांतून वांचविलें होतें, ते लोक तर तिला बाल्टिमोरची राणीच म्हणूं लागले. 'फ्रीडम ऑफ दी सिटी ऑफ लंडन' मिळणें हा एक मोठा बहुमान समजतात. हा बायकांना तर क्वचित् एकादे वेळी मिळतो. १८७३ सालीं गिल्डहॉलध्ये फार नामांकित समारंभ झाला; आणि बर्डेट हिला हा सन्मान प्राप्त झाला.
 बर्डेटचे मित्रही फार मोठाले लोक होते. चार्लस डिकन्स हें नांव मागें आलेलेंच आहे. थॉमस मूर हाही तिचा मित्र होता. डॉ. मोफात आणि डॉ. लिव्हिंग्स्टन हे आफ्रिका खंडाचे संशोधक मिशनरी या बाईच्या मित्रपरिवारांतीलच होते. सुदान प्रान्तांत सेनापति गॉर्डन् याचा वध झाला, हे आपल्याला माहित आहे. साम्राज्यवादी सरकारचा तो एक हस्तक म्हणून आतां त्याचें नांव अप्रिय झाले असले, तरी गॉर्डन हा मोठा उमदा आणि उदार माणूस होता. सुदान प्रान्ताकडे जेव्हां तो शेवटीं जावयास निघाला, तेव्हां बर्डेटचा निरोप घेण्यासाठी तो तिच्या घरीं कांहीं वेळ जाऊन राहिला होता. जातांना 'आपले स्मरण म्हणून मला एक लहानशीं पत्रपेटिका आपल्या हाताने द्या,' अशी विनंती त्याने बर्डेटला केली. गॉर्डनवर पुढे जेव्हां तेथील रानटी लोकांनी हल्ला केला, आणि त्याच्या छातीवर भाले रोखले, तेव्हां कोटाच्या आंवल्या अंगाला त्यानें आपल्या मैत्रिणीची ही पत्र