प्राणिमात्र तेथून सारे एकच आहे; आणि आपण जर खरेखुरे ख्रिस्ती आहोंत, तर या लोकांना मदत केली पाहिजे, असें तिनें ठरविले; आणि एक मोठा थोरला निधि तिनें जमा केला. तीन लक्ष रुपये जमा करून तिनें सुलतानाकडे पाठवून दिलें. सुदान, झुलूलॅण्ड इकडे लढाईवर गेलेल्या शिपायांच्या स्वास्थासाठीं तिनें लाखों रुपयांच्या देणग्या दिल्या. जेरुसलेम शहरांत पिण्याच्या पाण्याची नीट व्यवस्था नव्हती. म्हणून जुन्या काळीं तेथें घातलेले खापरी नळ जर शहरचे अधिकारी पुन्हां चालू करीत असतील, तर खर्चाची व्यवस्था आपण करूं, असें बाईनें तेथील अधिकाऱ्यांना कळविलें. परंतु अधिकाऱ्यांना ही कल्पना मानवली नाहीं; आणि त्यांनी बाईच्या दातृत्वाचा उपयोगही करून घेतला नाहीं.
बर्डेट बाईची दृष्टि किती विशाल आणि सूक्ष्म होती, हें आणखी एका प्रकारणावरून दिसून येईल. १८५८ सालीं एडिंबरो येथें ग्रे नांवाचा माणूस मरण पावला. त्याचा दफनविधि झाला. पण त्याला नातेवाईक फारसे कोणी नव्हते. एक बॉबी नांवाचा विश्वासू कुत्रा मात्र होता. रोजच्या रोज हा कुत्रा आपल्या धन्याच्या गारीपाशीं येऊं बसून लागला. स्मशनांतील पहारेकऱ्यानें त्याला हांकून द्यावें, पण बॉबीनें धन्याच्या गारीपाशीं पुन्हा येऊन बसावें, असा क्रम चालू झाला. होता होता पहारेवाल्यांना त्याची कींव येऊ लागली; आणि ते त्याला भाकरी टाकू लागले ग्रेच्या खड्डयावर दगडसुद्धां बसविला नव्हता. थोड्याच दिवसांनीं सारी जमीन सपाट होऊन गेली. आणि ग्रेला कोठें पुरले आहे, हें सुद्धां कळेनासें झालें. पण बॉबीनें मात्र त्या ठिकाणाची ओळख चांगली ठेवली होती. वर्षामागे वर्ष गेलें. पण बॉबीने धन्याच्या गारीवरील पहारा कधींच सोडला नाहीं; आणि पहारेकऱ्यांनी त्याला तुकडा टाकावयाचे कधीं बंद केले नाहीं. पुढें १८६७ साली नगरपालिकेनें कुत्र्यावर कर बसविण्याचे ठरविले. अध्यक्षांच्या कानावर बॉबीची हकिगत गेली. तेव्हां त्यांनी आज्ञापत्रक काढलें कीं, बॉबीला कर माफ व्हावा! त्यांनीं कौतुकाने त्याच्या गळयांत एक चांगलासा पट्टाही घातला. वर्षानुवर्ष कुत्रा मालकापाशीं येतच राहिला. शेवटी १८७२ सालीं बॉबी मरण पावला. त्याच्या विश्वासूपणाची ही हकीगत बर्डेट हिच्या कानीं आली. तेव्हां तिनें बॉबीचा एक पंचरशी धातूचा पुतळा केला; आणि एक अतिशय सुंदर तांबड्या संगमरवरी पाषाणाचा स्तंभ उभा करून त्यावर तो बसविला. पायथ्याशीं कुत्र्यांना पाणी पिण्यासाठीं म्हणुन एक सुंदरशी पुष्करणीही बांधली. प्रो. ब्लॅकी
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
कर्तबगार स्त्रिया