Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
कर्तबगार स्त्रिया
 


कसा सुटेल, असें बर्डेटला झालें होतें. परंतु तिचा कांहीं इलाज चालेना. अशा अडचणींतून बाहेर पडावयास कांहीं कायद्याचा आश्रय मिळतो कां, असेंही तिनें पाहिलें; पण याहीं काम तिची निराशा झाली.
 लवकरच लंडन शहरांत हातमाग चालविणाऱ्या कोष्ट्यांच्या धंद्याचा प्रश्न उत्पन्न झाला. हे कोष्टी रेशमी कापड विणीत असत; आणि या कापडाला गिऱ्हाईकही चांगलें असे. देशादेशांत दळणवळण वाढूं लागलें होतें. त्यामुळे लंडनची बाजारपेठ हस्तगत करावी, असें परकीय देशांतील कापडवाल्यांना वाटू लागलें. रेशमी कापडांच्या ताग्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे लंडनमध्ये येऊ लागले; व हें कापड स्वस्त मिळू लागलें. अर्थात् शहरांतील कोष्ट्यांचा धंदा एकदम बसला; आणि लवकरच त्यांना अन्नान्नदशा प्राप्त झाली. बर्डेटबाईचें लक्ष त्यांच्या दुःस्थितीकडे गेलें. ज्याला जी मदत हवी असेल, त्याला ती देण्याचें काम तिनें सुरू केलें. पोट भरण्यासाठी परदेशी जातों, असें जे म्हणाले, त्यांना तिनें वाटखर्चीला पैसे दिले. जे कुणी दुसऱ्या धंद्यांत पडूं म्हणाले, त्यांना तिनें भांडवलें दिलीं. ज्यांना घरचें कोणी नव्हतें, अशा बायकांचा आणि मुलींचा प्रश्न तर फारच बिकट बनला. पण बर्डेट हिनें या मुलींना निरनिराळ्या प्रकारचीं शिक्षण देऊन कामाला लावलें; आणि प्रौढ स्त्रियांना शिवण्या-टिपण्याचें काम गांठून दिलें. पोलिसांना आणि लष्करांतील शिपायांना खूप पैरणी लागत. या कामाचा मक्ता घेऊन या प्रौढ स्त्रियांचा प्रश्न बर्डेटनें सोडविला. जे कोणी आजारी होते, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था तिनें केली. अशा रीतीनें बेकार बनलेल्या कोष्ट्यांचा प्रश्न केवळ खाजगी रीतीनें सोडविण्यांत आला.
 १८६७ साली लंडनच्या पूर्वभागांत महामारीची साथ आली; त्याबरोबर बर्डेट हिनें नर्सेस, आरोग्य तपासनीस इत्यादिकांची नेमणूक करून या सर्व वस्तींत जंतुनाशक द्रव्यांचा सडा घालण्याची व्यवस्था केली. मिळवते पुरुष पटापट मेल्यामुळे बायकामुलें उघड पडू लागली. म्हणून तांदूळ, ॲरोरूट, मांस, साबुदाणा, निरनिराळ्या तऱ्हेचीं मद्ये, दूध, रजया, ब्लॅकेटें असें पदार्थ या वस्तींत तिनें खंडीवारी पाठवून दिले.
 इकडे बर्डेटबाईचा हा परोपकाराचा उद्योग चालूं असतां, ड्यून याच्या खेपा चालूच होत्या. शेवटी पैक्याआडक्याच्या बाबतींत त्यानें लबाडीचें कृत्य केलें. म्हणून त्याच्यावर खटला होऊन त्याला पांच वर्षांची शिक्षा झाली. बर्डेट हिला