टच्या भोंवतीं भोंवतीं करूं लागला. तिनें प्रथम प्रथम त्याच्याकडे लक्षच दिलें नाहीं. मग 'बाई घरांत नाहीत,' असें नोकरांकरवीं सांगण्याचा परिपाठ तिनें चालू ठेवला. इतक्यांतूनही दृष्टादृष्ट झालीच, तर ती त्याच्याकडे तिरस्कारानें पाहूं लागली. हें सारें तिने केलें; पण ड्यूनचा लघळपणा कांहीं केल्या संपेना.
पातकी स्त्रियांना समाजांत आणून सोडण्याची योजना प्रत्यक्ष अंमलांत आणाल्यानंतर, लंडन शहराच्या दरिद्री वस्तींतील मच्छी बाजाराकडे बर्डेट हिचें लक्ष गेलें. हा बाजार अतिशय घाणेरडा असे. मक्तेदार लोक मालाची कोंडी करून गरीब लोकांना तो महागाईनें विकत. बर्डेट हिनें जवळच एक चांगलीशी जागा पाहून एक मोठा शोभिवंत, स्वच्छ आणि ऐसपैस असा मच्छीबाजार बांधला; आणि स्वतंत्र तऱ्हेनें तेथें माल आणवण्याची व्यवस्था केलीं. अशासाठीं कीं, तेथील गरीब गिऱ्हाईकाला तो स्वस्ताईनें मिळावा. गरीब लोकांना साहाय्य करण्याची बर्डेटची बुद्धि खरोखरच चांगली होती. पण मक्तेदारांनी या कामांत तिला यश मिळूं दिलें नाहीं. स्वतंत्रतणें ते तेथें मालच येऊ देईनात. आणि शेवटी तिनें हें सुरू केलेलें मार्केट केवळ रिकामें पडून राहिलें.
लवकरच बर्डेट हिनें दहा लक्ष रुपये खर्च करून वेस्ट मिन्स्टर येथें आपल्या पित्याचे स्मारक म्हणून, एक चर्च बांधलें आणि कांहीं शाळाहि बांधल्या. या संस्थांना लागणारा सर्व खर्च बर्डेट स्वतः करीत असे. हें चर्च तर इतकें सुंदर बांधलें होतें, की लोकांनीं त्याच्याकडे बघतच रहावें. त्याचें शिल्प तर वाखाणण्यासारखें आहेच आहे; पण तेथें ठेवलेल्या पुराणकालीन कांहीं कांहीं वस्तू मुद्दाम जाऊन पहावयास हव्या, अशा योग्यतेच्या होत्या. ड्यूक ऑफ विलिंग्टन यानें स्थंडिलावर घालावयास एक भरजरी चादर दिली होती, आणि भोंवताली लावावयास गजनीचे पडदे दिले होते. श्रीरंगपट्टणावर हल्ला करून जेव्हां या ड्यूकनें टिपू सुलतानचा राजवाडा हस्तगत केला, तेव्हां जमा केलेल्या लुटींत ही भरजरी चादर आणि हे गझनीचे पडदे त्यानें तिकडे नेले होते. अशा या शोभिवंत ठिकाणीं मुलांमुलींच्या शिक्षणासाठीं बर्डेट हिनें हरतऱ्हेच्या संस्था प्रस्थापित केल्या; आणि कामकरी वर्गातील मुलां- मुलींना येथील शिक्षणाचा उत्तम उपयोग होऊं लागला. बर्डेट हिचें लक्ष अशा परोपकारांच्या कार्यात गुंतलेलें असे; पण ड्यून यानें आपली चिकाटी सोडली नाहीं. नको त्या ठिकाणीं हा दत्त म्हणून येऊन उभा राही; आणि परोक्ष रीतीनें आपली प्रीतीची मागणी तिच्या कानावर घाली. आपल्या मागचा हा ससेमिरा
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बॅरनेस बर्डेट कूटस्
४१