घराघरांच्या मध्यें सोडलेली जागा, मुलांना खेळावयासाठीं राखून ठेवलेली जागा, अशी सर्व तऱ्हेची अद्ययावत् व्यवस्था तिनें केली; आणि लोक स्वच्छता ठेवतात ना, यावरही पाळत ठेवली. हे गाळे इतके चांगले बांधले आहेत, कीं घरबांधणीच्या कल्पनांत बदल होत चाललेले असले, तरी ते अजूनही आधुनिकच असल्यासारखे दिसतात!
हें झाल्यावर डिकन्स यानें या बाईचें लक्ष दुसऱ्या एका बाबीकडे वळवलें. लंडन शहरांत अशा कितीतरी स्त्रिया होत्या, कीं ज्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेला होता. डिकन्सला वाटे कीं, या बाया मूळच्या गुन्हेगार किंवा पातकी नाहीत. त्यांच्यावर भलभलते प्रसंग गुदरल्यामुळे त्या असल्या हीन अवस्थेला येऊन पोहोचल्या आहेत. या दारुण परिस्थितींतून त्यांना सोडवावें, अशी योजना डिकन्स यानें आंखली; आणि प्रश्न स्त्रीजातीचाच असल्यामुळे बर्डेट कूटस् हिनें तो फार ईर्ष्यानें हातीं घेतला.
या बायांना सुधारावयाचें, तर प्रथम त्यांची चांगल्या ठिकाणीं राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, हें ओळखून बर्डेट हिनें 'सदन' नांवाची एक भली मोठी इमारत बांधली. ज्या कोणा स्त्रीला पापाच्या आणि घाणीच्या कर्दमांतून बाहेर पडावयाचें असेल, तिनें या सदनांत येऊन रहावें, अशी पत्रे या स्त्रियांना डिकन्स यानें स्वतःच लिहिली. प्रत्यक्ष पत्रे लिहिण्याचें काम जरी डिकन्स यानें केलेले असले, तरी माहितगार लोकांच्या मताप्रमाणें, त्या पत्रांतला सारा मतलब बर्डेटनें सांगितलेला असे. कारण, अशा स्त्रियांचें मानसिक दुःख काय असूं शकेल, याची खरी खरी कल्पना स्त्री म्हणून, बर्डेटलाच असणें शक्य होतें. पत्रांत म्हटलेले असें कीं, 'बाई, मी तुम्हांला पत्र लिहितों; पण मी कोणी तुमच्याहून श्रेष्ठ माणूस आहे म्हणून लिहीत नाहीं. तुमच्या वर्तनाची ओळख तुम्हांला करून देऊन तुम्हांला लाजवावें, किंवा तुमच्या मनाला क्लेश उत्पन्न करावे, अशी इच्छा मला खरोखरच नाहीं. तुमच्या संबंधीची केवळ करुणाबुद्धिच माझ्या मनांत वागत असते. अशा परिस्थितींत सांपडलेल्या माझ्या बहिणीला मीं जसें लिहिलें असतें, तसेंच मी तुम्हांला लिहीत आहे. आपल्या या नगरीतील एका उदारमनस्क श्रीमंत कुमारिकेनें तुम्हांला आश्रय मिळावा, म्हणून एक सुंदरसें सदन बांधलें आहे; सध्यांच्या आपल्या गर्तेतून बाहेर पडावें, अशी इच्छा जर तुम्हांला खरोखरच होत असेल, तर तुम्ही तत्काळ या सदनांत या आणि तेथें वसति करा. तुम्ही रस्त्यावरून
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बॅरनेस बर्डेट कूटस्
३९