प्रेमवेडा बनलेल्या आजोबानें सारी दौलत एका नटीच्या हवाली केली होती. ही दौलत बरोबर घेऊन नटी दुसऱ्या नवऱ्याच्या घरीं गेली होती. पण मरतांना तिला सद्बुद्धि झाली; आणि इतकीं चंचल बनलेली लक्ष्मी योग्य मार्गावर येऊन, आँजिला जॉर्जिना हिला मिळाली! तेवीस वर्षांची, अत्यंत सुस्वरूप तरुण मुलगी, रहावयाला राजवाड्यासारखीं सुंदर मंदिरें, भोवताली कित्येक एकरांचें रम्य उपवन, आणि घरांत दोन कोट रुपयांचा खजिना. अर्थात् या देखाव्याकडे कोणाकोणाचें लक्ष गेलें असेल, याची कल्पना आपल्याला सहज करतां येते. पण इतिहास घडला तो मात्र निराळा!
मोठमोठाल्या डचेसेस्, इंग्लंडचा वृद्ध मुख्य प्रधान डयूक ऑफ विलिंग्टन्, अशा सारख्या थोर स्त्रीपुरुषांची वात्सल्यबुद्धीची पाखर तिच्यावर राहूं लागलीच. पण नवलाची गोष्ट ही कीं, तेव्हां हळूहळू उदयास येऊ लागलेला इंग्लंडचा सुप्रसिद्ध कादंबरीकार जो चार्लस् डिकन्स, त्याची आणि आँजिला जॉर्जिना हिची ओळख झाली. डिकन्सचें कादंबरीवाङ्मय वाचून जॉर्जिनाच्या मनांत, समाजांतील हीन, दीन, दुःखी, दुबळी अशा लोकांविषयीं मोठीच करुणा उत्पन्न झाली होती. त्यांतच जेव्हां त्याची प्रत्यक्ष ओळख झाली; आणि तो तिच्याशीं संभाषण करूं लागला, तेव्हां या स्त्रीच्या मनाला कारुण्याची मोठीच भरती येऊ लागली; आणि आपल्याजवळ असलेल्या पैशाचा उपयोग निर्धन आणि कष्टी लोकांच्या विपत्ती नाहीशा करण्याकडेच करावा, असा निश्चय तिनें केला.
डिकन्सला बरोबर घेऊन ही श्रीमंतीण लंडन शहरांतील दारिद्र्यानें गांजलेल्या आणि घाण व दुर्गन्धी यांचा बुजबुजाट झालेल्या पेठांतून मुद्दामच हिंडूं लागली. 'नोव्हास्कोशिया बाग' या नांवाची एक अतिशय घाणेरडी वस्ती तेव्हां लंडन शहरांत होती. ही वस्ती म्हणजे रोगाचें माहेरघरच बनलेलें असे. चिखल आणि सडके पदार्थ ही जिकडे तिकडे पसरलेलीं असत; आणि नीतिअनीतीचा कसलाही विवेक येथल्या लोकांना राहिलेला नव्हता. चोरटे, खुनी, आणि छिनाल अशा लोकांचा गजबजाट येथे झालेला असून प्रत्यक्ष पोलिसांनाही तेथें जायची भीति वाटत असे. बर्डेट कूटस् हिनें ही सगळींच्या सगळी बाग म्हणजे ह्या वस्तीची सारी जागा सरकारांतून एकदम विकत घेतली. आणि, पहिल्या सपाट्याला तेथलीं सारीं घरे पाडून टाकून चांगलें स्वच्छ मैदान बनवलें; मग या मैदानावर आधुनिक पद्धतीचे गाळे बांधून तिनें या लोकांना रहावयास दिले. पाण्याच्या तोट्या, संडास, मोऱ्या,
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
कर्तबगार स्त्रिया