नटीच्या नांवानेंच करून टाकली. अर्थात त्याची नात जी जॉर्जिना तिला मोठाच विषाद वाटला. हा विषाद अधिकच तीव्र बनावयास आणखी एक कारण झालें.
वृद्ध नवरदेव लवकरच मेलेले आणि नटी तर श्रीमंत बनलेली. या नटीनें ड्यूक आफ सेंट अलवान्स या सरदाराशीं पुनर्विवाह केला. म्हणजे कूटस् च्या घराण्यांतील सारा पैसा ड्यूकच्या घराण्यांत गेला! कूटस् च्या घराण्यांतील कांही माणसांनीं आतां डचेस बनलेल्या या बाईची मर्जी संपादण्यासाठीं पुष्कळ लटपटी करून पाहिल्या; परंतु कांही उपयोग झाला नाही. मात्र विशेष गोष्ट म्हणजे ही कीं, आजोबांचा पैसा आपल्याकडे यावा, म्हणून जॉर्जिनानें या बाईची कधींही मनधरणी केली नाही.
पण दैवाचें चक्र मोठें गंमतीनें फिरत राहिलें; आणि कोणाच्या ध्यानीं ना मनीं असा एक प्रकार या डचेसनें करून टाकला. आपण मरतों असें जेव्हां तिला दिसूं लागलें, तेव्हां आपल्याकडे आलेली सारी दौलत कूटस् च्या घराण्यांतील आहे हें ओळखून, या बाईनें मृत्युपत्रांत लिहून ठेवले कीं, "माझ्या पहिल्या नवऱ्याची नात जी अँजिला बर्डेट, तिला ही सारी दौलत मिळावी. अट मात्र एवढीच कीं, बर्डेट या आपल्या आडनांवापुढें कूटस् हें आजोळचें आडनांवही तिनें जोडून द्यावे." अशा रीतीनें तेवीस वर्षांच्या वयाला अजिला जॉर्जिना बर्डेट हिला दोन कोट रुपयांचा खजिना वारस म्हणून मिळाला! खुद्द इग्लंडच्या राणीची सुद्धां खाजगी दौलत इतकी मोठी नव्हती.
भरींत भर म्हणून आणखी एक मौजेची गोष्ट घडून आली. ड्यूक ऑफ सेन्ट अलबान्स याच्या बायकोनें पहिल्या नवऱ्याकडून आलेली दौलत त्याच्या नातीच्या नांवानें करून ठेवतांना आपल्या दुसऱ्या नवऱ्याची म्हणजे ड्यूकचीहि एक तरतूद करून ठेवली. बावन एकरभर पसरलेल्या तिच्या मिळकतींतील एका उद्यानांत एक मोठा सुंदर राजवाडा होता. हें उद्यान व हा राजवाडा तिनें ड्यूकच्या नांवाने करून टाकला. यांतून त्या ड्यूकला दर वर्षी एक लाख रुपये मिळत असत. याचा भोगवटा थोडीशी वर्षे घेतो तोंच या ड्यूकलाहि मरणानें गांठले; आणि मग, ही मिळकतही अँजिला जॉर्जिना हिलाच वारसा हक्काने मिळाली.
नशिबाचा जोर असला म्हणजे काय घडतें तें बघा. वास्तविक पाहतां, तिचा बाप जो सर फ्रान्सिस, त्याच्यापाशीं कांहींच फारसें नव्हते; आणि म्हातारपणीं
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/४१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बॅरनेस बर्डेट कूटस्
३७