अंगालाच वळू लागले. ते म्हणाले, 'आम्हां पुरुषांच्या मनांत स्त्रियांच्याविषयीं जर हेंच पाप वागत असेल, तर स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणेंच अवश्यक आहे!'
इंग्लंडांत सर्वच बाजूनी स्त्रियांची कुचंबणा होत असे. स्त्रिया कितीही हुषार असल्या, तरी सरकारी नोकरींत त्यांचा प्रवेश होणें मुश्कील असे; आणि चांगल्या चांगल्या वेतनाच्या जागा तर त्यांना मुळींच मिळत नसत. प्रत्यक्ष तिच्या वडील बहिणीची या बाबतींत काय दुरवस्था झाली होती, तें आपल्याला माहीतच आहे. १८८२ साली विवाहित स्त्रियांच्या जिनगीचा कायदा पार्लमेंटने पास केला; पण तोपर्यंत स्त्रीला स्वतः मिळवलेल्या धनावर सुद्धां कसलाही हक्क नसे. वारसा रूपानें तिला जें कांहीं मिळालें असेल, व तिनें स्वकष्टानें जें मिळविलें असेल, तें तें सारें नवऱ्याच्या मालकीचें होत असें. तिला भिकेला लावून नवऱ्याने तिचें हें सारें धन भोगावें, नासावें, विकावे, अशी वहिवाट होती. अर्थातच मिसेस फॉसेट् यांनीं अशी चळवळ सुरू केली कीं, बायकांना मतदानाचा हक्क मिळाल्याशिवाय त्यांच्या वर होत असलेला हे जुलूम कधींही नाहींसे होणार नाहीत.
असें समजू नयें कीं, फॉसेट बाईंना या कामी साहाय्याला कोणींच नव्हतें. देशांतल्या बहुतेक साऱ्या सुशिक्षित स्त्रिया यांच्या बाजूच्याच होत्या; आणि जसजसा त्यांच्या वाणीचा प्रभाव अधिकाधिक पडत चालला, तसतशी खुद्द राजधानीच्या शहरांतही त्यांची छाप पडत चालली. लंडनमध्ये त्यांच्या व्याख्यानाला अफाट गर्दी होऊं लागली; आणि बायकांची सभा म्हणून बाजूला तोंड करून फिदिफिदी हंसण्याची प्रवृत्ति पूर्णपणें मावळून सर्व श्रोते बाईचीं व्याख्याने मोठ्या अदबीनें ऐकूं लागले.
ब्रिस्टल येथें १८७१ साली त्यांचे एक मोठे दांडगे भाषण झाले. कोणी असा आक्षेप घेतला होता की, जर स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला, तर त्यांच्या ठिकाणचें मार्दव व संस्कृतीचा हळुवारपणा यांचा लोप होऊन जाईल; आणि स्त्री शब्दानें जें जें कांहीं ध्वनित होतें, तें तें सारें नष्ट होईल. या आक्षेपाला उत्तर देतांना बाईंनीं काढलेले उद्गार खरोखरच मननीय आहेत. त्या म्हणाल्या, 'जी गोष्ट मूलतःच लाजिरवाणी आणि बेअब्रूची नाहीं, तिचा अवलंब स्त्रीने केला, म्हणून स्त्रिया आपलें स्त्रीत्व गमावून बसतील, असें तुम्हीं सम
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/३८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
कर्तबगार स्त्रिया