प्रपंचातील आपल्या जबाबदाऱ्यांविषयीं त्यांच्या मनांत कधींही तिरस्कार उत्पन्न झाला नव्हता. इतकेंच नव्हे, तर आपल्या प्रापंचिक जीवनांत गोडी उत्पन्न व्हावी, म्हणून 'जें जें करतां येणें शक्य होतें, तें तें सारें फॉसेट्बाई करीत असत.
आपली घरे जर खरी खरीं सुखाचीं निवासस्थान व्हावयास हवीं असली, तर स्त्रीचा दर्जा वाढावयास हवा; आणि लौकिक जीवनांत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचें स्थान प्राप्त व्हावयास हवें, असें मात्र त्यांचे मत बनले होते. स्त्रीया म्हणजे घरांतील एक कामाठीण आणि आपल्या मनाला चाहील त्याप्रमाणे पुरुषांनीं वागवून घेण्याची एक वस्तु, हा सध्यांचा स्त्रीचा दर्जा प्रपंचांत कधींही खरें सुख उत्पन्न करणार नाहीं; अशी स्त्री नवऱ्याला आणि मुलांना ममत्वानें सुखी करूं शकणार नाहीं. म्हणून, तिची सामाजिक पदवीच उंच व्हावयास हवी; आणि यासाठीं मतदानाचा हक्क तिला मिळालाच पाहिजे, असें या विदुषीचें मत लोकांच्या पुढें जोरजोरानें येऊं लागलें.
ती स्वतः घरांत एरवींच्या प्रापंचिक स्त्रियांप्रमाणेंच वागे. नवऱ्याची बायको आणि मुलांची आई हीं नातीं ती कधींच विसरली नाहीं. त्यांतही नवरा आंधळा असलेला. वेड्या प्रेमाच्या पहिल्या झटक्यांत असल्या माणसाशीं लग्न केलेंही असेल; पण एकाद्या स्त्रीला पुढें पश्चात्ताप झाला असतां; आणि त्या नवऱ्याची अवहेलना ती करू लागली असती; त्याच्या जीविताचे तिनें केवळ पोतेरे करून टाकले असतें. परंतु, फासेट बाईनें नवरा आंधळा म्हणूनच पत्नीत्वाचे नातें अधिक मंजुळ आणि अधिक प्रेमळपणाचें करून टाकलें, त्याची सर्व तऱ्हेची निगा ती ठेवी; आणि लेखनाच्या कामांत त्याला हरतऱ्हेचे साहाय्य करी. उलटपक्षी, ज्या आपल्या प्रियकर पत्नीचें मुख त्यानें कधींही पाहिलें नव्हतें, तिच्यावर या प्रोफेसराची प्रीति केवळ अगाध होती.
एकदां असें झाले कीं, रपेटीला गेल्या असतांना फॉसेटबाई घोड्यावरून पडल्या. त्यांना बरेच लागले. त्यांना घरी आणल्यावर पुष्कळच धावपळ झाली. बायको घोड्यावरून पडली आहे, आणि तिला लागले आहे, येवढें फॉसेटना कळलें होतें. पण कुठें लागलें आहे, किती लागलें आहे, हें त्यांना कसें कळणार? विचारून विचारून त्यांनीं सर्वांना गांगरवून टाकले. ते म्हणाले, 'हिला जास्त लागले असले पाहिजे. पण मी भिऊ नये, म्हणून तुम्ही माझ्यापासून तें चोरून ठेवत असला पाहिजे.' इतकें बोलून फॉसेट ढसढसा रडूं लागले.
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/३३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मिसेस फॉसेट
२९