लोकशाही आहे, जर ती लोकमतावर आधारलेली आहे; आणि स्त्रिया जर 'लोक' शब्दांत अंतर्भूत होतात, तर त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला पाहिजे, असा आग्रह तिच्या बुद्धीला उत्पन्न झाला.
पीटर टेलर आणि जॉन स्टुअर्ट मिल हे स्त्रियांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनीं भरविलेल्या एका सभेत फॉसेट्बाईचें पहिले भाषण झालें. 'स्त्रीला मतदानाचा हक्क असावा,' हा भाषणाचा विषय होता. बाईनें भाषणाचा थाट असा सुंदर ठेवला, कीं सभेला जमलेले लोक अगदीं खूष होऊन गेले. त्यांची चर्या, त्यांचे हावभाव आणि लोकांची समजूत पाडण्याची त्यांची सौम्य आणि मोहक शैली यांचा श्रोत्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. या भाषाणाच्या मागोमाग ब्रायटन येथे याच विषयावर त्यांनी पुन्हां एकदां भाषण केले. श्रोत्यांपैकी अनेकांना हे 'नवें खूळ' पसंत नव्हतें. परंतु फॉसेट्बाईची विषयाची मांडणी आणि त्यांनीं केलेला कोटिक्रम हीं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धां वांटू लागे कीं, बाईच्या बोलण्यांत पुष्कळच तथ्य आहे. परंतु, 'बायकाना मतदानाचा हक असावा' हेच या ऐकणाऱ्यांना बिलकुल पसंत नव्हतें. त्यांनीं आपली नापसंती एका निराळ्याच तऱ्हेनें व्यक्त केली. ते म्हणूं लागले कीं, 'बाईच्या या नव्या थेरामुळें मि. फॉसेट् हे लोकांत अप्रिय बनूं लागतील; आणि पार्लमेन्टमधील आपली जागा ते गमावून बसतील!' ही भीति दाखविली, म्हणजे हा अंध माणूस बायकोला आवरून धरील; आणि अशा रीतीनें या विषयाचा कांटा आपोआपच निघेल, असा त्यांचा अंदाज होता. पण अंधाचे मतही बायकोसारखेंच होतें. शिवाय त्याला लोकप्रियतेची किंमत असली, तरी स्त्रियांच्या हक्काची किंमत जास्त होती. अर्थात् या दहशतीचा कांहीं उपयोग झाला नाहीं. आपल्याला जें कृत्य न्यायाचें दिसतें, तें केलेच पाहिजे, असा आग्रह पतिपत्नींनीं धरला. आणि प्रथम प्रथम जरी कोणी विरोध केलेला असला, तरी शेवटी फॉसेट् बाईच्या प्रतिपादनाला इंग्लंडांत यश मिळालें.
'स्त्रिया सार्वजनिक जीवनांत थोडी हालचाल करूं लागल्या, की यांना संसाराचीं कामें करावयास नकोत, चूल सैंपाकिणीच्या हवाली करावी; मूल दाईच्या करावें, आणि आपण 'टोळ, टोळ' करीत गांवभर हिंडावें, यांतच असल्या बायका भूषण मानतात," अशी त्यांची निंदा सुरू होई. फॉसेट् बाईना ही निंदा आरंभापासूनच सहन करावी लागली. खरी गोष्ट अशी होती कीं,
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/३२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
कर्तबगार स्त्रिया