या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
कर्तबगार स्त्रिया
तिचें दर्शन घेणाऱ्या लोकांची अशी खेचाखेच झाली, की चार माणसें प्रत्यक्ष मेलीं, आणि अडीच हजार घायाळ झाली.
अवघ्या नऊ वर्षात इव्हानें ही लोकप्रियता संपादिलेली होती. तिच्यासाठीं एक मोठी समाधि बांधूं घातली. आतांपर्यंत ती तयार होऊन इव्हाचें शव आंत गेलेंहि असेल. पेरॉन हा आतां पोरका झाला; आणि अर्जेंटिनाच्या लक्षाधि प्रजा इव्हा द्वारटीसाठी अजूनहि दुःखाचे उसासे टाकीत आहेत.
● ● ●