आंत अगदीं मुठींत आणला. पण वैभव, सौंदर्य, सामर्थ्य यांचा तमाशा पहात दुर्दैव मिष्कलपणा जवळच कोठेतरी बसलेलें असतें; आणि कोणाला नकळत भलत्याच वाटेनें येऊन लोकांच्या अन्नांत तें माती कालवतें. त्यांच्या खिरींत खराटा घालतें; याणि त्यांच्या वैभवाला सुरुंग लावतें.
सारे नेक चाललें असतां एक कोटी सत्तर लक्ष प्रजांची प्रीति संपादिलेल्या या जोडप्यचें बरें देवाला बघवलें नाहीं. इव्हाला हळू हळू ताप येऊं लागला. "ताप सधासुधा नाहीं," असें वैद्यराज म्हणूं लागलें. "बाईसाहेबांना रक्तक्षय होण्याची चिन्हें आहेत" अशी कुरकूर ते करूं लागले. कॅन्सरचा वहिम येऊं लागत्यामुळे न्यूयॉर्कहून तज्ञ डॉक्टर विमानानें येऊन दाखल झाले. आतां आपले कांही नीट नाहीं, असें इव्हाचें इव्हाला कळून चुकलें. ती म्हणू लागली, "पेरॉन म्हणो माझा प्राण आहे, पेरॉन माझा सूर्य आहे. मी श्वासानें हवा आत घेतें, त्या हवेसारखा माझा पेरॉन आहे." याच व्याधींत तिनें आपलें आत्मचरित्र लिहून टाकलें. तिच्या दुखण्याची वार्ता सर्व देशभर पसरली; आणि यांतून ही आतां उठत नाहीं, असें सर्वाना वाटू लागलें. मग आपल्यापाशीं जे काय आहे तें तिच्या अर्पण करावें, ही वासना सर्व संस्थांना उत्पन्न झाली; आणि आजाराच्या शेवटच्या महिन्यांत राजदरबार, शिक्षण-संस्था, उद्योग-मंदिरें, आरोग्य-शाळा, कामगार मंडळे एक ना दोन, शेकडों हजारों संस्थांनी तिला पदव्या अर्पण केल्या; मानपत्रे दिलीं, नजराणे पाठविले. पण सगळ्यांच्या वर म्हणजे हजारोंच्या हजारों त्रिया तिच्या राजवाड्याच्या कुंसवाला पाठ देऊन मुसमुसत बसूं लागल्या. आपली आई नाहींशी होणार, हें पाहून अर्जेंटिनाच्या साऱ्या प्रजा हवालदिल होऊन गेल्या; आणि स्त्रिया व गरीब लोक यांना तर आपलाच प्राण कुडींतून चालला आहे, असें दुःख होऊं लागलें. होतां होतां तिचें वजन ऐंशी पौडांवर आले; शेवटी एके दिवशीं रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनीं प्रेसिडेंट जॉन पेरॉन शोकाकुल होऊन तिच्या खोलींतून बाहेर पडला; आणि बाहेर बसलेल्या मंत्र्यांना तो म्हणाला, "इव्हा संपली आहे!" वार्ता शहरभर पोहोचताच राजधानी दुःखाने केवळ वेडी होऊन गेली.
दुसरे दिवशीं तिच्या नेहमींच्या सुवर्ण मंदिरात तिची शवपेटिका आणून ठेवण्यांत आली. पांच लक्ष लोक अश्रू ढाळीत पटांगणात उभे होते. फाटक उघडतांच
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/११५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इव्हा पेरॉन
१११