अशा गर्जना चलूं होत्या. पोलिस गप्प उभे राहिले, आणि लष्करचे शिपाई टकमकां बघतच राहिले. काय होत आहे, हेंच त्यांना कळेना. या पन्नास हजार कामगारांनी संध्याकाळपर्यंत सारें शहर ताब्यांत घेतलें. आणि इस्पितळांतून बाहेर काढून पेरॉन याला त्यांनी मोटारींत बसवून जंगी मिरवणूक काढली. मिरवणूक राजवाड्याकडे गेली. अध्यक्ष फॅरेल यांनी चांगलेंच प्रसंगावधान दाखवलें. आपण कैदेत टाकलेला माणूस लोकांचा एवढा आवडता आहे हें पाहून, त्यांनी त्याला राजवाडयाच्या सज्जांत बोलवून घेतलें. त्याची लोकप्रियता न पाहवणऱ्या एका पत्रानें आपल्या जादा अंकात म्हटलें कीं, "फाटकीं कुडतीं घातलेले देशभक्त साऱ्या सडकांवरून हिंडत आहेत." पेरॉन यानें त्या पत्राचे तेच शब्द उचलले आणि सज्जावर बसवलेल्या ध्वनिक्षेपकांत तो गरजला, "हो! हो! हे कुडतीं नसलेले लोक देशभक्तच आहेत; आणि याच गरीब लोकांना मी उराशी कवटाळून घेणार आहे." हे त्याचे शब्द ऐकतांच पटांगणावर पसरलेला तो लोकसमुदाय त्याच्या नांवाचा जयजयकार करूं लागला; आणि 'अर्जेंटिनाचा खरा लोकनायक पेरॉन होय,' हें ठरून गेलें. पण ही डांबर-बत्ती कोणी शिलगावली होती? ती इव्हा द्वारटीनें शिलगावलेली होती. अर्थात् तिच्या सौंदर्याच्या जोडीला हें तिचें अचाट कर्तृत्व पाहून पेरॉन तिच्यावर केवळ लुब्ध होऊन गेला. चारच दिवसांनीं पुढें इव्हा आणि जॉन यांचें लग्न झालें.
इव्हा द्वारटी हिच्याकडे पाहून वरिष्ठ अधिकारी नाके मुरडत; कारण तिची जन्मकथा अशीतशीच होती. तिला स्वतःला याची जाणीव असल्यामुळे या आपत्तींतून बाहेर पडण्याचे मोठे चमत्कारिक इलाज तिनें केले, ही आपत्ति नसती तरी पुढें केलेलीं कृत्यें तिनें केली नसतीं, असें मात्र म्हणतां येत नाहीं. लग्न न झालेल्या एका गरीब जोडप्याची ती पोर होती. गरिबीचा दंश तिच्या मनाला इतका कडकडून झालेला होता, की त्या स्थितींतून बाहेर पडण्याची तिनें शिकस्त केली. ती नाटक-सिनेमांत शिरली. तेव्हां तिचा महिन्याचा पगार सुमारें दोनशे रुपये होता; परंतु तिच्या गुणांच्या बळावर हा पगार थोड्याच अवधींत बत्तीस हजार रुपयां पर्यंत वाढला. मिळू लागलेल्या या संपत्तीचा उपयोग या बांईनें कसा केला, हें पाहण्यासारखें आहे. आपले लग्न एका मोठ्या माणसाशीं झालेलें आहे, या विचारांतच ती दंग होऊन राहिली नाहीं. शहरांतल्या सगळ्या गरीब लोकांना सुखी कसें करतां येईल, याचें चिंतन ती करूं लागली. आणि पदरचे पंचवीस हजार रुपये घालून कामकऱ्यांना,
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/११२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
कर्तबगार स्त्रिया