अधिकाऱ्याच्या हें ध्यानांत येऊन चुकलें; म्हणून 'तूं राजिनामा दे' असा हुकूम त्यानें त्याला धाडला. आज्ञापत्र आणणाऱ्या शिपायाला त्यानें सांगितलें कीं, "हा हुकूम धाडणाऱ्या त्या गाढव अधिकाऱ्याला सांग कीं, जीव गेला तरी बेहत्तर पण माझ्या पदावरून मी हलगार नाहीं." पण येवढा जवाब देऊनच तो थांबला नाहीं. त्याच्या संस्थेतील सदस्यांची संख्या आतांपर्यंत कित्येक शतकांवर गेली होती. आणि हे सारे सदस्य त्याच्या अर्ध्या वचनांत असत. यांतल्या सहा जणांना पेरॉन यानें आपल्या वरिष्ठाकडे पाठवलें. हातांत बंदूक घेऊन या सहा जणांनीं त्या वरिष्ठाला त्याच्याच कचेरींत घेरा दिला; आणि 'तूंच राजिनामा दे; नाहीतर मेलास म्हणून समज,' असें त्याला दरडावून सांगितलें. त्या सेनापतीनें गांगरून जाऊन राजिनामा दिला; आणि जॉन पेरॉन म्हणजे लष्करांतील एक बडी आसामी होऊन बसली.
पण जॉन याचें खरें लक्ष लष्कराकडे नव्हतें. देशांतीला कामगार लोक अर्धपोटी रहातात, हें त्याला मुळींच सहन होईना. त्यानें ताबडतोब कामगार संघ स्थापन केले, अधिकाराचा बडेजाव बाजूला ठेऊन त्यांच्याशीं तो समत्वाच्या नात्यानें वागू लागला. सरकारदरबारीं ज्यांना कांहीं विशेष महत्त्व होतें, त्यांनाच वश करून घेऊन त्यानें या लोकांना कामगार संघाचे पुढारी नेमले.
जॉन यानें मुसोलिनीचें जवळ जवळ अनुकरणच केलें; मात्र या अनुकरणांत तो फार सावधगिरीनें वागला. तो एकदां म्हणाला, "मुसोलिनी हा या शतकांतला सर्वात मोठा पुरुष होय. पण त्याच्या हातून फार मोठाले प्रमाद घडले. हे प्रमाद माझ्या हातून घडू नयेत, अशी दक्षता मी ठेवतों." मुसोलिनीची राज्यरचनेचीं सर्व तत्त्वें जॉन यानें अंमलात आणली, आणि सत्ता हस्तगत केली; मात्र प्रतिपक्षाचे खून पाडणें आणि आपल्या कर्तृत्वाची भलतीच घमेंड बाळगणे हे प्रकार त्यानें केले नाहीत.
१९४५ मध्ये पेरॉन यानें ठरविलें कीं, अध्यक्षाच्या जागेसाठीं आतां उभें रहावयाचें; याच वेळीं दुसरें महायुद्ध संपलें; आणि लोकशाहीचा डंका जगभर झडूं लागला. अर्जेंटिनामध्येहि लोक घसा फोडून 'लोकशाही, लोकशाही' म्हणून ओरडूं लागलें. पेरॉन यानें हें बंड मोडण्यासाठी हजार लोकांना कैद केलें. प्रेसिडेंट फॅरेल याला त्याचें हें कृत्य बिलकुल पसंत नव्हतें. म्हणून त्यानें पेरॉनला
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/११०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
कर्तबगार स्त्रिया