| ही भुकेली तरुणी भुकेल्यांची पोशिंदी बनली! |
इव्हा पेरॉन : ११ :
या प्रकरणांत इव्हा पेरॉन या अर्जेंटाईनमधील महाकर्तबगार स्त्रीची हकीगत द्यावयाची आहे, दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना नांवाचा, दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला एक विस्तीर्ण देश आहे. सारीच दक्षिण अमेरिका पूर्वी स्पेनच्या ताब्यांत होती. तीनशे वर्षेपर्यंत या प्रदेशावर स्पेनचा अंमल अबाधित राहिला होता. हळू हळू तो खालावत चालला; आणि त्या त्या ठिकाणच्या लोकांनीं आपली स्वतंत्र राष्ट्रें बनविलीं. या राष्ट्रांपैकींच अर्जेंटिना हैं एक राष्ट्र आहे.
जॉन पेरॉन हा या प्रजासत्ताक राज्याचा अधिपति होता; व ज्या स्त्रीचें चरित्र पुढे दिलेलें आहे, ती इव्हा त्याची पत्नी होती. या पराक्रमी इव्हाचें चरित्र नीट समजून घ्याययाचें, तर जॉन पेरॉन याचाहि थोडासा इतिहास कळावयासच हवा.
जॉनचा बाप कोर्टातला साधा बेलिफ होता. अर्जेंटिनाच्या दक्षिण प्रदेशाला पंपास हें नांव आहे. हा प्रदेश उजाड असला तरी चांगला सुपीक आहे. यांतीलच एका खेड्यांत जॉनचें बालपण गेलें. १६ वर्षांच्या वयाला त्याचा लष्करी शाळेंत प्रवेश झाला. तलवारीचे हात करण्यांत आणि बंदुकीचा नेम मारण्यांत जॉन पहिला येऊ लागला. दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हां एका मुत्सद्याच्या दिमतींत त्याला रोम येथें जावें लागलें. तेथें तो मुसोलिनीचा मोठा चहाता बनला. त्याचें सामाजिक आणि आर्थिक तत्त्वज्ञान त्याला पटूं लागलें. आल्प्स पर्वतांत कवाईत करणाऱ्या इटालियन फौजांबरोबर तो हिंडूं लागला; आणि आपल्या राजवाड्याच्या सज्जांतून जेव्हां मुसोलिनी गर्जना करी, तेव्हां ती कान भरून ऐकण्यांत तो दंग होऊन जाऊं लागला.
इटलीतून परत आल्यावर आपल्या लोकांचें आत्मिक बळ वाढवले पाहिजे, असें ठरवून त्यानें एक संस्था स्थापन केली. लष्करांत थोडीशी वरची जागा मिळतांच त्यानें आपल्या वगीचे लोक शेलक्या ठिकाणीं नेमून टाकले. वरील