लक्षण होतें. चालिरीतीला ती वाईट होती असें नव्हें. पण, जिथें जिथें दुसऱ्यांनी आडवावें हें तिला बिलकुल खपत नसे. तिनें ताडकन् उत्तर दिलें कीं, "तुम्हीं ज्यांना दूरचे लेखता, त्यांच्याशींच काय पण जे प्रत्यक्ष निग्रो आहेत, आणि म्हणून फारच दूरचे आहेत, त्यांच्याशीसुद्धां माझी मैत्री आहे; आणि त्यांच्याबरोबर मी केव्हां केव्हां चहासुद्धां घेतें" अजूनसुद्धां निग्रोला कशा तऱ्हेची वागवणूक अमेरिकेत मिळते, हें आपल्याला माहीत आहे. शें सवाशे वर्षापूर्वी तर त्यांच्याशीं यत् किंचितहि सामाजिक संबंध आणणे मोठे पातक समजत असत. अशा वेळीं या तरण्याताठ्या पोरीनें असली भ्रांतिष्ट उत्तरे द्यावीत, याचा समाजाला फारच विस्मय वाटूं लागला. खरें म्हटलें म्हणजे तिला या निग्रोंची अतिशय कींव येत असें; आणि कांतडी पांढरी असल्यामुळेंच जे बदमाश समाजांत खुशाल मान वर करून वागत असत, त्यांच्यासंबंधानें तिला पराकाष्ठेचा तिरस्कार वाटे.
तिनें एका शाळेत नोकरी धरली. तेथें अशा कांहीं पुंड प्रजा जमा होत, कीं पुरुष मास्तरालासुद्धां जीव नकोसा होऊन जाई; मग मास्तरीणकाकूंची दशा काय विचारावी! तेथें जमा होणाऱ्या पोरी खूप धांगडधिंगा करीत, मस्तवाली करीत, आणि शिक्षकाला कसें पळवून लावतां येईल, याकडेच त्यांचें लक्ष असे. असल्या या शाळेत सुसाननें नोकरी धरली. या मंडळींनीं थोडीशीं गडबड करतांच पलिकडच्या तरवडाचा एक फोंक तिनें काढून आणला; आणि एकेकीचें पाठाण असें सडकून काढलें, कीं तिला जन्माची आठवण रहावी. एवढें होतांच शाळेंत जिकडे तिकडे चिडीचिप झालें. लोक म्हणूं लागलें कीं, "मास्तरीण कसली? हा पैलवानच आहे!" पुढे लवकरच सुसान हिला काना जोहारी येथल्या एका मुलींच्या शाळेची प्रिन्सिपल म्हणून नेमण्यांत आलें. बाईंचा एकंदर वचक बघून शाळेचा एक विश्वस्त म्हणाला, "आजपर्यंत असला वचक ठेवणारा मास्तरसुद्धां आम्हांला मिळाला नव्हता, मग मास्तरीण तर लांबच राहो." लवकरच या गांवांत एक निराळी लहर उत्पन्न झाली.
गांवांत पुष्कळ गौळवाडे होते. कुणाच्य गोठ्यांत पन्नास गाई, कुणाच्या गोठ्यांत शंभर गाई, असे अनेक गोपाळ तेथें होते. त्यांना वाटू लागलें कीं, ही आडदांड बाई पोरीसोरींना वचकांत ठेवण्याच्या कामी खर्ची पडते, हें बरें नव्हे. ती जर कां आपल्या गोठ्यांत आली, तर आपल्याला बायकोहि होईल; आणि हिचे बाहू चांगले भक्कम असल्यामुळे एका सकाळांत ती सान्या गाईच्या धाराहि काढील. अशा
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुसान बी. अंथनी
९७