Jump to content

पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला भेटायला आला तर त्याला दारसुद्धा उघडलं नाही. बाहेरच्या बाहेरच त्याची बोळवण केलीन. बरं नाही म्हणाला. तुला कळवायचं का म्हणून मित्रानं विचारलं तर नको म्हणाला. शेवटी त्या मित्रानं मला पत्र लिहिलं. पत्र मिळाल्याबरोबर मी आलो.
 'पण म्हणजे झालंय तरी काय त्याला? अन् मला काही बोलला का नाही? मला ह्या विचित्र वागण्याचा अर्थच कळत नाहीये.'
 ' तो आता तू त्यालाच विचार. बरं, येऊ मी? आता तू आलीयस, आता मला काही काळजी नाही.'
 'विश्वजित, ह्या सगळ्यात तू काहीतरी हातचं राखून ठेवतोयस अस वाटतंय मला.'
 'ठेवलं असलं तरी ते मग सांगेन. आता उशीर झालाय.'
 'एवढ्या रात्री तू कुठं जातोस? इथंच झोप.'
 'नको मी लॉजवर जाईन.'
 'विश्वजित, मला एकटी सोडू नको.'
 'घाबरू नको विभा, तसं घाबरण्यासारखं काही नाही. सकाळी येतोच मी, आणि चारूवर रागराग करू नकोस.'
 'मी चारूशी कसं वागायचं हे तू मला सांगू नको.'
 चारू अजून झोपला नव्हता. विभानं विचारलं, 'चारू तुला बरं नाही का? काय होतंय?'
 'मला काही समजत नाही.'
 'म्हणजे काय? डोकं दुखतंय की पोट दुखतंय की ताप आलाय की आणखी काही?'
 'तसं सांगता येत नाही, पण कसंतरी अस्वस्थ वाटतंय.'
 'मग डॉक्टरला दाखवलंस का?'
 'नाही.'
 'का नाही? स्वत:च्या प्रकृतीची हेळसांड करण्यात पुरुषार्थ वाटतो का तुला?'
 'रागावू नको विभा.'
 'चारू, हे काय? रडू नको. रागावले नाही रे मी, रागावेन कशी?' तिनं त्याला जवळ घेतलं.
 रात्रीतून चारूला ताप भरला. सकाळी विश्वजित येतो तो चारू तापानं

कमळाची पानं । ९२