पण तो फारसं न जेवता उठला, काही बोलला नाही, आणि जाऊन झोपला.
मग विभा म्हणाली, 'हं. बोल.'
'काय बोलू?' विश्वजित म्हणाला.
'हेच, जे चारूच्या समर्थनार्थ तू बोलणार होतास ते.'
'समर्थन करण्याचा प्रश्न नाही, विभा.'
'म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराचं काही समर्थन होऊ शकत नाही असं तुला म्हणायचंय का? मग माझं तुझं एकमत आहे.'
'आवाज चढवू नको, शांत हो.'
तू मला शांत व्हायला सांगतोस विश्वजित? मी महिना दीड महिन्यानंतर घरी येते, तर ह्या उकिरड्यानं माझं स्वागत केलं जातं. मी नसताना चारूनं हवं तसं राहावं, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण मी घरी येणार तेव्हां घर जरा स्वच्छ, प्रसन्न दिसेल अशी तजवीज करायला नको होती? मी सगळं केलंच ना? मग त्याला करायला काय हरकत होती? मी करताना मला मदत सुद्धा केली नाहीन, अलिप्तपणे बाजूला बसून होता. हे घर, हा संसार काय माझा एकटीचा आहे? की पोटाला मिळवलं म्हणजे आपली जबाबदारी पार पडली, मग बाकी सगळं विभानं सांभाळावं असं वाटतं त्याला?'
बोलता बोलता संतापाचे अश्रू तिच्या डोळ्यांत उभे राहिले. काही न बोलता विश्वजितनं तिला जवळ ओढली. त्याच्या स्पर्शानं तिचे सगळेच बांध फुटले नि ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. तिचे हुंदके थांबेपर्यंत तो तिला थोपटीत राहिला. शेवटी ती त्याच्यापासून लांब झाल्यावर त्यानं आपला रुमाल तिच्या पुढं केला.
ती म्हणाली, 'काही नको, आहे माझा पदर.'
त्याला हसू आलं. तशी ती पुन्हा धूमसायला लागली नि धुमसता धुमसता त्याच्या बरोबर हसायला लागली. म्हणाली, 'माझा इकडं जीव जातोय नि तुला हसायला फावतंय.'
हसणं थांबवून एकदम गंभीरपणे तो म्हणाला, 'जीव तुझा नाही जात,चारूचा जातोय.'
ती चमकून म्हणाली, 'म्हणजे?'
तेच तर मी तूला सांगायला बघतोय तू फुरसत दिलीस तर. चारूला काहितरी झालंय. गेले आठ दिवस तो कामावर गेला नाही. त्याचा एक मित्र
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/91
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ९१