श्रीपतीच्या आत्याचं वेगळंच होतं. तिची रीतच टेढी. ती रंगवून रंगवून काही गोष्टी सांगत राहायची.
'ती सीताबायची प्वार न्हवं का सा वर्साची जाली तरी आजून रांगत बी न्हाई. पहिलं प्वार उशीरान् झालं का असंच काय तरी व्हतं.'
राधा तेवीस वर्षांची होती आणि तिचं लग्न होऊन सात वर्ष झाली होती. आत्याला सारखी सांगावीशी वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे,
'एका बाईचं प्वार पोटात इतकं वाढलं की शेवटी प्वार कापावं लागलं आन् बाळ-बाळंतीन दोघंबी म्येले म्हनं.'
श्रीपती मुंबईहून आला तेव्हा सगळ्यात त्याच्या नजरेला जाणवलेली गोष्ट म्हणजे हडकलेली, फिकुटलेली राधा अन् तिचं वाढलेलं पोट. तिला धड हलताही येत नव्हतं.
'तुम्ही तिला सोनगावला डॉक्टरकडे का नाही नेलं?'
'सुईण बलावली व्हती.'
'त्या अडाणी बाईला काय कळतं का?'
'तू अस्शील मोटा हापसर पोलिसात मंबईला-' आई संतापून बोलायला लागली, 'ह्ये बघ, तू मला अक्कल शिकवू नगं. नस्लं हुईत तर जा घिऊन तिला. हितं कुनाला न्हायी ती झगझग हवीये? आन् येवढं काय जालं धुसमुसायला? जगामधी काय कुनाला प्वारं हुईत न्हायीतका काय?'
श्रीपती जरा शरमला. पण बायको ऐकत असताना तो आईला वरचढ होऊ देणार नव्हता.
'बस्स झालं. फार बडबड करतीस तू आई. मी तालुक्याला जातोय टॅक्सी आणायला तिला बसनं जाणं नाही सोसायचं. आणि तुही तयारी कर यायची. दवाखान्यात कणीतरी हवंच तिलाही.'
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचं ऐकून श्रीपतीला काळजाचा ठोकाच चुकल्यासारखा वाटला.
'म्हणजे तिच्या पोटात पोरच नाहीये?'
नाही. तो एक ट्यूमर आहे. म्हणजे एक गाठ झालीय तिच्या पोटात.'
'पण सगळे तर म्हणाले की...'
डॉक्टरांच्या नजरेत कीव होती.
'तुम्ही लोक सगळे सारखेच. चांगल्या डॉक्टरला दाखवली असतीत तर हे तूम्हाला आधीच कळलं असतं. ट्यूमर काढून टाकता आला असता आणि
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/71
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ७१