केला नाही. टोनीला भेटलेच नसते तर बरं झालं असतं असं मला वाटत होतं. दुपारी दिसलेली रोमा नाहीशी होऊन आता वेगळीच रोमा साकार झाली होती. जराशी उदास, विझल्यासारखी. दुपारचा दुवा तुटला होता. तो सांधावासं एकदम वाटलं. मी विचारलं, 'उद्या येशील माझ्याबरोबर साइटसीइंगला?' ती म्हणाली. 'आवडलं असतं यायला, पण उद्या मला मुळीच वेळ होणार नाही. टोनीला हे आवडणार नाही म्हणून ती असं म्हणाली की काय ते कळायला मार्ग नव्हता.
मी जायच्या दिवशी ती मला एअरपोर्टवर भेटायला आली. एक लहानसं पार्सल माझ्या हातात ठेवून म्हणाली, 'छोटी छोटी प्रेझेन्टस् आहेत आई, दादा वगैरेंच्यासाठी. न्याल ना?'
'हो जरूर.'
'पाहिजे तर पार्सल फोडून आतल्या वस्तू सुट्या न्या म्हणजे कस्टम्सचा त्रास होणार नाही.'
मग काही बोलण्यासारखं सापडेना. आम्ही शेजारी शेजारी बसून लोकांची जा ये. बघत होतो. ती तिथं आली हे टोनीला माहीत होतं की नाही ह्याची मी चौकशी केली नाही.
ती म्हणाली, 'मामाला सांगा माझं छान चाललंय, मी मजेत आहे म्हणून' बिवलकरांनी मला हेर म्हणून पाठवलं होतं. आणि ही तिकडे जाऊन काम रिपोर्ट द्यायचा ते पढवीत होती.
मी म्हटलं, 'जरूर सांगेन.' मग न राहवून विचारलं, 'एकटीच आलीस?
'नाही. टोनीला दुपारी वेळ असतो. त्यानं स्कूटरवरून आणलंन्.'
'मग तो आत नाही आला?'
'बाहेरच थांबलाय.'
'पण का?'
एकदम ती खळखळून हसली. नाहीतरी तो उदास गंभीर मुखवटा तिच्या चेहऱ्यावर नीट बसत नव्हताच. 'म्हणाला, मी आपला बाहेरच थांबतो. पुन्हा काल रात्रीसारखं नको.' थोडं थांबून ती म्हणाली, 'तुम्हाला तो काही फारसा आवडला नाही, खरं ना?' 'आम्ही फार वेळ भेटलो कुठे होतो त्याच्याबद्दल मत बनवायला?'
तिनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. फक्त म्हणाली, 'तो जरा लाजरा नि अबोल आहे, त्यामुळे पहिल्या भेटीत कुणावर चांगलं इंप्रेशन पडत नाही
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/66
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ६६