Jump to content

पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करून स्वस्तात ताजी भाजी आणि फळं कशी मिळतात ते सगळं तिनं मला ऐकवलं.
 मी त्यांच्यासाठी खाऊ म्हणून चॉकलेटस् घेतली. पर्समधून पैसे काढताना गाइड दिसलं तशी आठवण झाली म्हणून विचारलं, "हो खरंच. ॲपियन वे पहायला कसं जायचं कल्पना आहे तुला? दोन-चार जणांना विचारलं, पण कुठली बस, ती नक्की कुठून निघते काही पत्ता लागला नाही.'
 'काही कल्पना नाही बाई,' ती म्हणाली. 'कुठेशी आहे ॲपियन वे?'
 'म्हणजे तू पाहिला नाहीस?'
 'नाही.'
 'हा रोमन साम्राज्यातला पहिला रस्ता. बावीसशे वर्षांपूर्वी बांधलेला. माहीत होतं तुला?'
 तिनं मान हलवली.
 'इतर तरी काही पाह्यलंस का? रोमन फोरम, कॉलोसियम वगैरे?'
 'तसं नीटपणे पाहायला वेळच झाला नाही अजून.' तिचा स्वर ओशाळलेला वगैरे नव्हता.
 ही कार्यक्षम मुलगी गृहोपयोगी जिनसा कुठे स्वस्त आणि चांगल्या मिळतात याविषयी मन लावून संशोधन करते आणि इतिहासाच्या एका महान आणि थरारक पर्वाच्या खुणा अवतीभवती विखुरलेल्या असताना त्या जाऊन पाहाण्याचेही कष्ट घेत नाही हा प्रकार मला आकलनच होईना. जणू ती राहात असलेलं शहर रोम होतं हा केवळ एक योगायोग होता.'
 टोनीला भेटून माझी निराशा झाली. मी त्याला खलनायकाचा रोल दिला होता. पण तो धोरणी, कावेबाज असाही वाटला नाही. आणि कुणी एकदम याच्या प्रेमात पडावं इतका लोभसही वाटला नाही. जरा मंदच वाटला. चटकन् हसून बोलून अनौपचारिक खेळीमेळीने वागू शकत नव्हता. तिच्या सारखा. एकंदर माझ्या भेटीविषयी तो फारसा खूष दिसला नाही. रोमाला तिच्या जगापासून शक्य तितक्या लांब ठेवण्यावर त्यांच्या सहजीवनाचं यश पलबून आहे असं जर त्याला वाटत असलं तर हे साहजिकच होतं. काहीही असो, आम्ही दोघं एकमेकांना फारसे आवडलो नाही हे उघड होतं. मग रोमाही गप्प गप्प झाली.
 जेवणानंतर मी फार वेळ थांबले नाही. रोमानेही मग थांबण्याचा आग्रह

कमळाची पानं । ६५