पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "हे इतकं निरवानिरवीचं वाटतं. मला सांग, कशामुळे तू इतका अलिप्त झालायस?"
 तो क्षितिजाकडे शांतपणे बघत राहिला. सूर्य मावळतीला लागला होता, आणि त्याचा प्रकाश हवेतल्या धुळीमुळे सांद्र झाला होता.
 "मी काही अलिप्त नाही," तो म्हणाला, "खरंच नाही."
 आणखी काही तिनं बोलायच्या आत तो उठला.
 "अंधार पडत चाललाय. आपली घरी जायची वेळ झाली."
 त्या दिवशी रात्री जेवल्यावर प्रताप आणि लेविन जाळीच्या व्हरांड्यात बराच वेळ बोलत बसले होते. उन्हाळ्यामध्ये काही निस्तब्ध रात्री अशा असतात की दिवसभराचा उकाडा घालवून द्यायचं त्यांच्या जिवावर येत. ही रात्र अशीच होती. द्राक्षांचा आंबुसगोड वास वातावरणात भरून राहिला होता. कपडे न उतरताच सरोजिनी बिछान्यावर पडली होती. तिला वाटल, या वासाचा किती तिटकारा वाटतो आपल्याला. तिच्या चोहोबाजूला तो दरवळत होता, एखाद्या तटबंदीसारखा.
 थोड्या वेळानं ते दोघं एकमेकांचा निरोप घेताना तिनं ऐकलं. लेविन स्वत:च्या खोलीकडे गेला आणि प्रताप बाहेर गेला हे तिनं पाहिलं. आता तो दिवसाकाठचा शेवटचा फेरफटका मारील; सगळं काही ठीकठाक आहे हे जातीनं पाहण्यासाठी. ती उठली. तिनं साडी नीटनेटकी केली. आरशासमोर उभं राहून तिनं केसावर हात फिरवला.
 उकाड्यानं तिचं शरीर तापलं होतं. श्वास घेण्याच्या श्रमानं तिच हृदय धडधडत होतं. लेविनच्या दारावर तिनं टकटक केलं.
 "ये," तो म्हणाला.
 "मला वाटलं, तुला कदाचित पाणी लागेल. रात्र गरम आहे आज."
 "थंँक्स!"
 पलंगाजवळ टेबलावर तिनं तांब्याभांडं ठेवलं.
 "एकमेकांजवळ बोलण्यासारखं पुष्कळच सापडलं तुम्हा दोघांना. तुला आणि प्रतापला."

 "हो ना. खरोखरच. तू का नाही आलीस आमच्यात?"
 तिनं खांदे उडवले. बोलण्यासारखं काही दुसरं नव्हतंच. ती तशीच उभी राहिली, त्याची नजर आपल्या नजरेनं खेचून घेत. तिच्याकडे जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यांत जे दिसलं त्यामुळे भयाची एक लाट


कमळाची पानं । १६