हे पान प्रमाणित केलेले आहे.
गोष्टींवर अवलंबून नसलं पाहिजे. कुठल्याही बदलाला तोंड देऊ शकत नाही ते नातं ताठर, स्थिर, वाढू न शकणारंच असणार."
"तत्त्वज्ञानात शिरू नको."
"हे तत्त्वज्ञान नाही, कॉमनसेन्स आहे. तुझं जर खरं असलं तर मग नवऱ्याची बदली झाली आणि बायकोला मुलांच्या शिक्षणासाठी तिथंच राहावं लागलं तर त्यांचं नातं तुटायला पाहिजे."
"वेड घेऊन पेडगावला जात्येयस."
"तुला निरुत्तर करणारा मुद्दा मांडला की मी वेडी!"
"हं! तू मला निरुत्तर करणार!"
ती एकदम गप्प बसली. ढगाआडूनसुद्धा चंद्राचा प्रकाश जाणवत होता. वाऱ्याच्या झुळकीबरोबर पारिजातकाचा मंद वास आला. ठराविक, अतिवापराने गुळगुळीत झालेली प्रतीकं कशाची?
"आत चल." तो म्हणाला. "डास चावायला लागलेत." तो उठला. त्यानं पुढं केलेला हात दुर्लक्षून ती म्हणाली, "तू जा, मला अजून झोप आली नाही. मी इथंच बसणाराय जरा."
स्त्री ऑगस्ट १९८३
कमळाची पानं । ११३