पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १० वा. - O - मीं सहकारिता कां पत्कराची ? हें व्रत कां ध्यावें ? हा वसा कां घ्यावा? lar as Sir १०४ सहकारिता म्हणजे सदुणांचा मळा, दरिद्याची काम' धेनू आंधळ्याची काठी किंवा पंगूचा श्यामुकर्ण आहे. सहकारी कोठा म्हणजे सांपत्तिक, सामाजिक आणि नैतिक सदुणांची एक शाळा आहे. आपणांत केवढें सामथ्र्य सांठविलेलें आहे याची जाणीव सहकारितेनें उत्पन्न होते. अंगीं सामथ्र्य असून केवळ अज्ञानामुळे त्याची ओळख नसणें या सुारखे दुर्दैव नाही. पै पैसा, दिडकी दुगाणीचा फंड करून केवढें राघूकार्य जिंकतां येते याची मूर्तिमंत शिकवण सहकारितेंत असल्यामुळे आतांपर्यंत ज्या सहकारी प्रयत्नांची पोथी ऐकली तिची सांगता काय, या पोथींत निरूपण झालेल्या व्रताची फलश्रुती काय, हैं सांगितलें पाहिज. १०९ सहकारी कोठा उघडला म्हणजे तुमचें दारिद्र्य हरेल. कारणः— १ या ठिकाणीं खचीं पडलेले पैसे जणूं पेरल्याप्रमाणें सव्याज उगवतात. सहकारी कोठ्यांत माल खरेदी करणारास दरवर्षी झालेल्या नफ्यापैकीं कांहीं प्रमाणांत नफा वांटून देतात. समजा, तुम्हांस १६ रु. पगार आहे. प्रपंचाच्या कामी तुम्ही हा पगार कोठ्यांतून धान्यधुन्य, कापडांची पड आणण्यांत खर्च केलेत म्हणजे जिनसाच्या रूपानें तुमचे रुपये वसूल होतातच, पण वर जेो नफा म्हणा किंवा