पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५ वा. सहकारी कोठा. " है। १. सहकारी कोठा ह्मणजे काय हैं एकदां कळलें ह्मणजे तो सह्कृारी कोठा काढावयाचा कूसा येवढेंच शिकावयाचें राहतें. म्हणजे काय. एखाद्या जवळ पैसा मुबलक असला तर तो एक ' नव्हे दहा कोठे उभारील. पण पैशाचीच तर आपणा कंगाल लोकृांजवळ वाणू आहे. ह्मणून दहाजणांनीं लकडी जमवून एकाचा बोजा तयार केला पाहिजे. थेंब थेंब. जमवून सगळ्यांची तहान भागविण्यास एक मोठं तळे सांचविलें पाहिजे. ६२. प्रपंचांत आपली दररोज कशी नाडवणूक होत असते, प्रपंचांत नाडव- हें आपण गेल्या दोन भागांत पाहिलें आहे. गृक कशी चा- दरिद्यांनां ही स्थिती कशी परवडणार ? यांची लते. चोहीकडून ओढाताण. आधीं मिळकत कमी आणि अशाही तुटपुंज्या प्राप्तीला वायफट वाटा फार. आपला व्यवहार आपण हातांत घेऊन काळजीपूर्वक पाहिला तर बरेंच हित साधेल. खाणावळींत जेवणें व घरीं जेवणें यांत जी खर्चाची काटकसर आहे तीच काटकसर बाजारांत एकट्या दुकट्यानें किरकोळीनें जिनसा खरेदी करणें व चारचौघांनीं मिळून त्या एकदम खरेदी घेणें यांतही आहे. चार पैसे उसनवार काढून हंगामांत जिनसा खरेदी करून सबंध सालाची बेगमी करून ठेवण्यांत हेंच धोरण असतें. पण हा एकट्या दुकट्याचा प्रश्न झाला. आपल्याला आपल्या शेजा-यांचा, आपल्या गांवक-यांचा, आपल्या देशबांधवांचा, आपल्या राष्ट्राचा प्रश्न याच धोरणानें सोडवावयाचा आहे.