पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 ER मोफत वाचनालयाची योजनाही अमलांत आणिली आहे. दरवर्षी या संस्थेचा ग्रंथसंग्रह सररहा वाढत आहे, इतकेंच नव्हे तर, नुसत्या दाखले पहाण्याच्या ग्रंथाचा निराळाच संग्रह ही मंडळी वाढविते. याप्रमाणें लोकशिक्षणाचा पवित्र प्रश्न सोडविण्याचा या संस्थेनें स्तुत्य प्रयत्न केला आहे. ६९. जातां जातां संस्थेच्या विस्तारासंबंधानें असें सांगिसंस्थचा परमो- तलें पाहिने कीं, सर्वेध गांवभर आतां या विणण्कर्ष. क-यांच्या मालकीची मालमत्ता पसरली आहे. मंडळींच्या राहाण्याच्या सोयी करतां आतां यांनीं स्वतःच्या मालकीची घरें बांधून काढिलीं आहेत. आपल्यांतील बेरोजगार मंडळींना रोजगार मिळावा ह्मणून यांनीं धान्य दळण्याच्या व कापडाच्या अनेक गिरण्या उभारल्या आहेत. शिक्षणाकरतां त्यांनीं एक स्वतंत्र फंड उभारला असून, नफ्या पैकीं शेंकडा २॥ टके त्या करतां ते अगदी वेगळे काढून ठेवितात. यांनीं आजमित्तीस आपल्या कारखान्यांत आपण शिकवून तयार केलेले लोक उपयोगी केले आहेत. अशा कामगारांनां जमिनी आंखून द्यावयाच्या, त्यावर त्यांचा चरितार्थ चालेसा करावयाचा, व अखेरीस त्यांना अशा जमीन जुमल्याचे मालक व स्वयंपूर्ण स्वावलंबी संस्थांचे चालक बनवून सोडावयाचे; असा श्रेष्ठ संकल्प रॅकडेलच्या महत्वाकांक्षी चालकांनी आज * जीवीं धरला आहे. ? ६०. रॉकडेल येथील संस्थेच्या इतिहासाचें जें पान आपण आतां वांचलें तें काय शिकविर्त ? तें असें शिकविर्त कीं, एकमेकांच्या हातांत हात घालून, मितव्ययानें पण प्रेमाच्या सहानुभूतीनें, Y{