पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चा आहे. सरकारही या नवीन उपायाची माहिती देण्याकरितां आज पुढें आलें आहे. परंतु आपणांसच या बाजूनें पुष्कळ करावयाचें आहे. तेव्हां आरंभीं आपल्यांतील जाणत्यांनीं या उपायासंबंधींची माहिती आपल्या बांधवांना आधीं करून दिली पाहिजे. सहकारितेची जाणीव लोकांत उत्पन्न करण्यास आपल्याकडे दुर्दैवामुळे अजून साधनें उपलब्ध नाहींत. लोकांस तर हा विषय अपरिचित आहे. शिवाय लोकांत शिक्षणाचें मान फारच कमी आहे. शेंकडा फार तर आपणांकडे २८ लिहिणारे वाचणारे सांपडतात. आपल्या राजभाषेत विपुल पुस्तकसंग्रह आहे खरा. पण खुद्द मुंबई ईलाख्यांत इंग्रजी जाणणारांचें शेंकडा १॥। प्रमाण पुरुषांत सांपडतें, आणि स्त्रियांत तर ५०० मध्यें १ स्त्री इंग्रजी जाणणारी मिळते. युरोपमध्यें साक्षर लोकांचें शंकडा ९५ प्रमाण आढळून येतें. जर्मनींत १९१० सालीं सैन्यांत जेव्हां नवीन भरती झाली त्यावेळीं नवीन उमेदवारांत निरक्षरांचें शैकडा ' ०२ प्रमाण मिळालें. शिक्षणाची आपणाकडे इतकी उणीव असतांना सहकारितेसारखा। नवा विषय लोकांत रिघविण्यास किती नवीं नवों साधनें निर्माण केलीं पाहिजेत याचा थोडासा तरी अजमास होईल. जें राघू आपल्या घटकावयव व्यक्तीची शिक्षणानें उन्नति साधण्यास अविरत खपत असतें तेंच राष्ट्र निरोगी असा छेटोचा अभिप्राय आहे. शिवाय नागरिकत्वाची योग्य कल्पना अंगीं भिनण्यास शिक्षणाची मातबर अवश्यकता आहे, याची ओळख आज आपणास झाली आहे. १४ व्या लुईसारखा महत्वाकांक्षी बादशहा आणि कोलबर्टसारखा साम्राज्यवादी मुत्सद्दी ! पण असल्या दर्पाक्रांत अमदानींतही राष्ट्रीय खजिन्याच्या किल्ठ्या वागविणा-या कोलबर्टनें राष्ट्राची धनोत्पादक शाक्त वाढविण्याकरितां शिक्षणप्रसारार्थ दीर्ध प्रयत्न केले होते. आपल्या राष्ट्राची धनोत्पादक शाक्त वाढविणें हैं अत्यंत जरूर आहे. आपण आज दरिद्री आहोत. आपल्या लोकांत उत्पादक धंदे चालविण्याची कार्यक्षमता कोठं कमी आहे तर कोठें अनुकूल साधनांचा अत्यंत अभाव आहे. अशा परिस्थितींत राष्ट्रीय औद्योगिक सामथ्र्याचा प्रश्न लोकशिक्षणप्रसारावांचून लंगडाच राहणार. इंग्लंडांतील औद्योगिक सहकारी प्रयत्नांची या छोट्या निबंधांत जी माहिती दिली आहे तिजवरून वरील प्रमेयांतील सत्यता स्पष्ट होते. एके काळीं पोटाची टीचभ