पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ नाहीं. १९०२ सालीं सहकारी चळवळ करणा-या लोकांची एक varar जंगी परिषद मैंचेस्टर शहरी भरलेली होती. या परिषदेस अमेरिके सारख्या दूरदूर प्रदेशांतून सुद्धां प्रतिनिधी आले होते. कौतुकाची गोष्ट अशी कीं, प्रत्येक प्रतिनिधि रॉकडेल गांवच्या सफरीस तेथून एखाद्या भाविक यात्रेकरूप्रमाणें गेला. एखाद्या क्षेत्रास निघालेल्या यात्रेकरूंत किंवा एखाद्या जत्रा यात्रेच्या ठिकाणीं जितकें अगत्य अथवा हुरूप नजरेस येतो तेवढें अगत्य आणि हुरूप या रॅकडेल क्षेत्राच्या दर्शनास निघालेल्या प्रत्येक प्रतिनिधीच्या अंत:- करणांत उसळत होती. ३१. अशी काय मोहनी या गावांत होती ? ती जी काय या क्षेत्रांतील दा- असेल, ज्या गोष्टीनें इतके भाविक यात्रेकरूं या एखाद्य आणि हा- गांवी आकर्षले असतील, त्या गोष्टीचा पूर्वापार श्रद्र, संगतवार इतिहास आपण क्रमाक्रमानें समजाऊन घेऊं. १८४४ च्या सुमारासू या गांवांतले बहुतेक लोक दारिद्यानें व भुकेनें आतोनात पांडिले होते. एकवेळ तुकडा आहे तर दुस-या was वंळेला नसावा. आंथरावयास केवळ भुसा असावा तर पांघरावयास निव्वळ आकाश अशा कठीण परिस्थितीत काळ कंठीत असणा-या' हजारों मजुरांनीं पोटभर भाकरी करतां मालकांवर रुसवा फुगवाही केला. पण उपयोग काय ? रुसशील तर उपाशी मरशील या न्यायानें १८३० सालीं लोकांनीं संप केला, पण अखेर त्यांनाच घरीं उपाशी बसावें लागलें. १८४१ सालीं सुमारें १६०० लोकांना या गांवीं सबंध आठवड्याचे रु. १ आणे ६ प्रमाणें वेतन पडू लागलें होतें, ह्मणजे सरासरी ३ आणे रोज पडला. ८६६ लोकाँ ना यांही पेक्षां कमी ह्मणजे आठवड्यास अवघे १८ आणे मिळत, ९०८ लोकांना तर बाराच आणे पडत आणि १३६ लोकांनां तर 2