पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ (१३) सहकारी कोठ्यांचा सर्व श्रेष्ठ असा फायदा म्हणजे लोक शिक्षणाचा. लोक शिक्षणाचा शुद्ध पाया मूळ ओवननें घातला. ओवेन यास जसा सहकारितेचा जनक तसा प्राथमिक शिक्षणाचा पिता असे समजतात. खिश्वन सोशियालिस्ट नांवाच्या समाज सुधारकांनीं निव्वळ धंदेवाईकांनां त्यांच्या फावल्या वेळांत धंदेशिक्षण मिळविण्याची सोय काढून देऊन त्यांस स्वयंपूर्ण करण्याची योजना केली. रॉकडेलच्या २८ कोष्टयांनीं हाच उदात्त किता गिरविला होता. शिक्षणाकरतां नफ्यपैकीं २॥ टके एका बाजूला शिक्षणफंड म्हणून काढून ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम करून ठेवला आहे. हा उदात्त नियम सर्व सहकारी मंडळ्या आज तागाईत पाळीत आल्या आहेत. या शिक्षणफंडांतून सभासदांच्या मुलांबाळांकरतां शाळा, धंदे शिक्षणाचे वर्ग, शास्त्रीय बालोद्यान पद्धतीचीं उपकरणें, सभासदांकरतां वाचनालयें,सामाजिक व नैतिक विषय समजाविणारी व्याख्यानें, सहकारिता समजाविणारी छोटीं छोर्टी पत्रकें व पुस्तकें, सहकारी वृत्तपत्रे वगैरे नानाप्रकारचीं प्रज्ञा वाढविणारी साधनें निर्माण करण्याच्या योजना होत असतात. आजमित्तीस सवे सहकारी संस्थांनीं एक संघ निर्माण करून त्यांकरवीं एक का: यमची शिक्षण कमेटी उभारली आहे. यांनीं लहान मोठ्या मुलांकरतां अधिकाराप्रमाणें वर्ग काढून त्यांत देशाचा इतिहास, देशाच्या व्यापाराचा इतिहास, उद्योगधंद्याची परिस्थिती वैगैरे विषय शिकविण्याची सोय केली आहे. यांनीं विश्वविद्यालयासारखी व्याख्यानमाला सुरु केली आहे. हे सहकारी लोक सामाजिक सेमेलोर्ने, पाट्र्यो, सभा, जत्रा, प्रद