पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

eq आंखून घेतलेल्या वार्षिक सुट्टया पहा. कामाचे तास माणशीं दररोज सहा पासून आठ पडतील. सुट्टया बारावर तरी सबंध सालांत मिळाल्या असतील; शिवाय आठवड्यास एक दिवस तरी अध्य सुट्टीचा असतोच. १९०९ सालीं युनायटेड किंगडम मध्यें १२०८ सहकारी मंडळ्यांतं ६९४ १६ नोकरांनीं एका आठवड्यास ३,१८१;९६८ तास काम केलें. याच्या सरासरीचें प्रमाण सुमरें एका आठवड्द्यास ९३॥९६ तासांचें म्हणजे रोजीं ८ तासांचें बसतें. हलीं तें सुमार ६ वर आलें आहें. (१०) याचेंच तिसरें उदाहरण म्हणजे सहकाश्री कोठ्यांच्या प्रसारामुळे लोकांचें आरोग्य वर्धन होतें सुधारलेलीं सरकारें । प्रजेंत आरोग्य नांदावें म्हणून मोठय़ा धोरणानें कायदे पास करीत असतात. यद्यपि परेि णिाम असावयाचा तसाच अनिष्ट असतो. दलदलीची जागा असेल तेथें मलेरिया होती, असें पुष्कळ आरोग्यशाखानें पढविलें आणि घरें शेतखाने कांहीं विशिष्ट त-हेनें बांधावेत असें पुष्कळ मुनिसिलिट्यांनी आणि कॅन्टोन्मेंट कोडांनीं फर्माविलें तरी दारिद्य सगळ्या नियमांनां हरताळ फासतें. चोहोंकडे बारा आणे रुपाया खण जागा झाल्यामुळे गोरगरीब शेणखर्याची, खता-या मुता-याची, डांस चिलटं वृंगरटांच्या अंडीं पिलांच्या मिराशीची स्वस्ताची जागा पत्करतात. करतील काय विचारे! सगळीं सोंगें साधतात, पण पोटाचें सोंग साधत नाहीं. आपल्या सभासदांस राहती घरें बांधून द्यावयाची असा एक रॉकडेलच्या संस्थेचा उदात्त हेतू होता. त्याचाच अनुवाद इतर सहकारी संस्थांनी केला आहे. या शिवाय तिकडे घरें बांधणा-या